*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
कोरोना या आजाराने तसेच नैसर्गिक व अन्य कारणामुळे मृत्यू पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक परवाना हस्तांतर होणार असून त्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे ते याप्रमाणे
महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग 1)शासन निर्णय क्रमांक;-मुद्रांक 2023/1358/प्र.क्र.356/म-1 दि.26/03/2024
दि.13/3/2024च्या निर्णयानुसार कोविड 19 या भयंकर महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे म्हणून तसेच अनेक मा. विधानसभा सदस्य व मा. संसद सदस्याकडून कोरोना काळात मृत्यू पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक विक्री परवाना हस्तांतर करण्याबाबत प्रशासनास अनेक निवेदने प्राप्त झालेली आहेत सदर निवेदनातील विनंती बाबत साधक बाधक विचार करून कोरोना महामरीमध्ये कोरोना या रोगाने मृत्यू पावलेल्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना तसेच राज्यातील इतर मयत मुद्रांक विक्रेते ज्यांचे मृत्यू दिनांक 24 /9 /2010 रोजी व त्यानंतर नैसर्गिक केव्हा अन्य कारणास्तव झालेले आहेत त्यांच्या वारसांना देखील वारसा हक्काने त्यांचा मुद्रांक परवाना हस्तांतरित करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती विक्रेत्यांच्या वारसांना उपजीविकेचे साधन मिळावे या दृष्टीने एक विशेष बाब म्हणून ज्या ठिकाणच्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणच्या जनतेच्या सोयीसाठी जनहितार्थ मुद्रांक विक्री परवाना हस्तांतर करण्याबाबत अटी व शर्तीनुसार पात्रता निश्चिती करून मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरित करण्यास दिनांक 23.3.2024 शासन मंजुरी देण्यात आली आहे
विशेषतः जे मुद्रांक विक्रेते वयस्कर झालेले आहेत त्यांना त्यांचा परवाना हस्तांतर करावयाचा आहे त्यामुळे असे निर्णय होणे आवश्यक असून ही मागणी जोर धरत आहे
त्या अनुषंगाने माळीनगर तालुका माळशिरस येथील कै. अशोक रामचंद्र येचकर हे दिनांक 14 /9 /2019 रोजी मयत झाले असून मयत कै. अशोक रामचंद्र येचकर यांचे नावे मुद्रांक विक्रीचा परवाना होता त्याचा रजिस्टर नंबर 32 / 1999 होता सदर परवाना मयत अशोक येचकर यांचे वारसदार पत्नी अनिता अशोक यांना मिळण्याबाबत अनिता येचकर यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक सोलापूर, जुने जिल्हाधिकारी कार्यालय- सोलापूर ,यांना दिले असून ते निवेदन अकलूज येथील सब रजिस्टर अपर्णा गुरव यांनी स्वीकारले आहे
याप्रसंगी मुद्रांक विक्रेते तनवीर खान, हुसेन सय्यद, जावेद चौधरी,आणि इतर मुद्रांक विक्रेते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा