*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
अकलूज
येथील सदाशिवराव माने विद्यालयातील माजी विद्यार्थी "सूरज पाटील "याची नुकतीच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्याचे आई-वडील व उप मुख्याध्यापक दत्तात्रय घंटे पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवनियुक्त पोलीस अधिकारी सुरज पाटील म्हणाले कि मी विद्यार्थी दशेत असताना आपल्यासारखाच विद्यार्थी या नात्याने इतरांचा सत्कार करताना मला अभिमान वाटायचा पुढे असेच एक दिवस माझाही सत्कार व्हावा अशी मी स्वप्न बघायचो. आज हे स्वप्न सत्यात उतरले. याचे भाग्य मिळाले याचे सर्व श्रेय मी माझ्या पालकांना व माझ्या गुरुजनांना देतो. खडतर कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्याने ठेवून नियमित व्यायामाकडे ही लक्ष द्यावे. शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरुस्त या उक्तीप्रमाणे बौद्धिक ज्ञानार्जनासोबत व्यायामलाही महत्व द्यावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट पवार यांनी केले. आभार सुहास पवार यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा