--- शेतकऱ्यांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये, नॅनो युरिया, नॅनो डिएपी,एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धत अंगिकारून उत्पन्नात वाढ करावी, तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, म.ग्रा. रोहयो अंतर्गत फळबाग लागवडीत सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊ साहेब रुपनवर यांनी केले.
बावडा मंडल क्षेत्र पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. त्यामध्ये पिठेवाडी गावातील प्रयोगशील शेतकरी व निर्यातक्षम डाळिंब उत्पादक सुभाष आगलावे यांचे डाळिंब फळबाग लागवडीस भेट दिली. तसेच खोरीची गावामध्ये राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा अभिानांतर्गत बाजरी पीक प्रात्यक्षिकास भेटी दिल्या.
सदर भेटीत मंडल कृषी अधिकारी जी. पी. सूर्यवंशी, कृषी पर्यवेक्षक के. पी. पांढरे, कृषी पर्यवेक्षक शिंगटे साहेब, कृषी पर्यवेक्षक घुले साहेब, मंडल कृषी सहाय्यक कुंभार साहेब, खोरोचीचे कृषी सहाय्यक भुजबळ साहेब, पीठेवाडी गावाचे कृषी सहाय्यक अंजली अडसूळ मॅडम उपस्थित होते. कृषी मित्र नामदेव बरकडे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - पिठेवाडी राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा अभिानांतर्गत बाजरी पीक प्रात्यक्षिकास कृषी अधिकाऱ्यांची भेट.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा