Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

*शंकरनगर येथील" प्रताप क्रीडा मंडळा"च्या वतीने भव्य बालक्रीडा स्पर्धेचे आयोजन*

 


*उपसंपादक --नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त आणि जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त भव्य बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.

            सन १९७८ पासून कला, क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा,राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा,आट्यापाट्या स्पर्धा,समूहनृत्य स्पर्धा,भव्य कुस्ती स्पर्धा या बरोबर सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना दिवाळी फराळ रत्नाई मिठाई वाटप,रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी,असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

           यावर्षी रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी श्री विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे एक दिवसीय बालक्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेमध्ये बालगट ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेत वयोगटानुसार लहानगट ४+ डोक्यावर चेंडू घेऊन पळणे,मोठा गट ५+ धावणे,६+ कमरेवर हात ठेवून उड्या मारत जाणे,७+ लंगडी घालत जाणे,८+ तीन पायाची शर्यत,९+ पोत्यात पाय घालून चालणे असे स्पर्धेचे क्रीडा प्रकार आहेत. 

           या स्पर्धेसाठी भव्य अशी बक्षिसे मंडळाच्या वतीने ठेवण्यात आली आहेत.स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना आकर्षण बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच सर्व स्पर्धेकांना मंडळाच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी क्रीडा संकुल येथे ६ मैदाने असून ४२ पंच काम पाहणार आहेत. स्पर्धा नियोजनबद्ध होण्यासाठी २४ समित्यातून मंडळाचे सदस्य कार्यरत आहेत.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रति विद्यार्थी ५० रुपये अशी नाममात्र प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी रमेश गायकवाड 9860876535, प्रशांत जगताप 9637174167, हनुमंत किर्दक 967303038, प्रल्हाद भोसले 9503361247, युवराज बनपट्टे- 9834755912, अभिजित कुरुळे, 9850584087 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव यांनी केले आहे. यावेळी स्पर्धा प्रमुख शिवाजी पारसे,भानुदास आसबे,संजय राऊत,अर्जुन बनसोडे,मंडळाचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा