Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

*सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात "झोनल लेवल अविष्कार- 2025" संशोधन स्पर्धा संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

अकलूज -- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दि. १०/११/२०२४ रोजी झोनल लेवल आविष्कार २०२५ ही संशोधन स्पर्धा महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा मा. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, सोलापूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. विराज निंबाळकर व श्री. वसंत जाधव हे उपस्थित होते. 

उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. शंकर नवले यांनी विद्यार्थ्यांना संशोधनातील त्यांचा अनुभव सांगत, संशोधनाचा विषय कसा निवडावा, संशोधन कसे करावे तसेच संशोधनाच्या परदेशातील संधिंबद्दल मार्गदर्शन केले.

या स्पर्धेमध्ये ॲग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी, कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, ह्युमॅनिटीज लँग्वेज अँड फाईन आर्ट, मेडिसिन अँड फार्मसी, प्युअर सायन्स या सहा विभागातील प्रोजेक्ट व पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धा विद्यापीठ प्रतिनिधी प्रा. रश्मी तांबारे व प्रा. वेदांत तिडके यांच्या निरीक्षणाखाली घेण्यात आल्या.


तसेच या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ.आबासाहेब देशमुख, शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्रा. डॉ.विश्वनाथ आवड, फार्मसी कॉलेज, बारामतीचे प्राचार्य डॉ विनोद पवार, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. रणजीत निंबाळकर, एडवोकेट हसीना शेख, माळशिरस तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे ,प्रा. सविता उपल्ली हे उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी मधून एकूण २१८ विध्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदविला. यातील सर्व विभागातील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची निवड ही युनिव्हर्सिटी लेवल रिसर्च स्पर्धेसाठी झालेली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष . जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले.

सदर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. अनिल कोकरे व प्रा. लक्ष्मी काळे यांनी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रीती सोमवंशी व कु. मिनाक्षी राऊत यांनी तर आभार प्रदर्शन प्रा .सुजाता रिसवडकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा