*इकबाल बाबासाहेब मुल्ला-- (पत्रकार )सांगली
असंख्य स्वप्ने घेऊन "राजस्थान" मधून सांगलीत आलेल्या "निपूल" या 16 वर्षाच्या अल्पवयीन तरुणाचा, गांजा व अन्य नशा करणाऱ्या अल्पवयीन युवकांकडून 25 वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
18 वर्ष हे "अल्पवयीन" नाही, हे "न्यायालयाला" कधी कळणार ??? 14 वर्षात अमेरिकेत एका मुलाने एका युवतीला गरोदर केले. मग या 14 वर्षाचा मुलगा अल्पवयीन कसा ??
16 ते 18 वर्षाची मुले सांगलीत गोकुळ नगर आणि मिरजेतील एका नगरमध्ये शरीरसुखाचा आस्वाद घेतात.मग ही मुले अल्पवयीन कशी??? 14-15 वर्षाच्या मुलांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल असतो त्यात अल्शील व्हिडिओ. सर्रास पाहिली जातात.आणि हिच मुले काही तथाकथित. कॅफेशॉप. मध्ये रंगेहाथ सापडतात .मग ही मुले "अल्पवयीन" कशी ??
कायद्यामध्ये आता तात्काळ घटनादुरुस्ती आवश्यक आहे.कारण वयाचा "फायदा" घेत अल्पवयीन मुले सऱ्हास "खुनाची मालिका" रचत आहेत. कायद्याचा "धाक" नाही,शिक्षा नाही त्यामुळे युवक बेफाम होऊन खून करत आहेत.
*गांजा - ड्रग्ज याचा बिमोड व्हावा !*
सांगली - मिरजेत गांजा व अन्य नशेच्या विक्रीबद्दल मी मागील वर्षी 5 लेख* लिहून "समाजप्रबोधन" केले होते. "कोल्हापूर परिक्षेत्र महानिरीक्षक. " साहेबांनी माझ्या लेखाची "गंभीर दखल" घेत ड्रग्ज चा साठा "जप्त" केला होता आणि टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
आज 2025 साली च्या पहिल्याच महिन्यात पुन्हा एकदा अल्पवयीन तरुणांकडून निर्घृण खून झाल्याने एकच खळबळ माजली असून नशेखोरीबद्दल पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी होतं आहे.त्याशिवाय अल्पवयीन गुन्हेगाराचे वय 15 करण्यासंबंधी कायदा व्हावा ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा