*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
ऊस ,ज्वारी, मका ,तूर हरभरा या पिकावरील नुकसान करणारी हेलॅओथिस आर्मिजेराही एक किडी आहे .या अळीस हरभरा तूर या पिकाचे घाटी खूप आवडतात व हीच्या प्रादुर्भावामुळे 35 ते 40 टक्के नुकसान होते .त्यामुळे या अळीचे एकात्मिक नियंत्रण करणे अतिशय महत्त्वाचे आहे .अंडी,अळी ,कोष व फुलपाखरू हा जीवनक्रम आहे. यामधील आळी हा जीवनक्रम अतिशय उपद्रवी असल्यामुळे तिचे नियंत्रण करणे गरजेचे आहे .या अळीचा पतंग पानावर कोवळी ,शेंडे ,फुल, कळी यावर अंडी घालतात अंडी एकत्रित घातलेली असून ती खसखशी सारखी दिसून येतात दोन ते तीन दिवसांनी आळी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर कोवळ्या पानाचे हरितद्रव्य खरवडून खाते व त्यानंतर कळ्या फुले घाटेवर नुकसान करते हरभऱ्याच्या घाटेला छिद्र पाडून आतील दाणे खाऊन साधारणतः एक आळी ३0 ते ४0 घाटांचे नुकसान करते यामुळे याची नुकसानाची तीव्रता खूप आहे .त्यासाठी खालील प्रमाणे एकात्मिक नियंत्रण करावे .
१-उन्हाळ्यात खोल नांगरट करून घाट्याळीचे जमिनीतील कोश जमिनीवर ते आल्यानंतर उष्णतेच्या तीव्रतेने पक्षाने वेचून खाल्ल्यामुळे याची पुढची पिढी तयार होत नाही २ -मसूर ,मोहरी, जवस यासारखी आंतरपिके लावावेत ३ -प्रतिहेक्टरी पिकापेक्षा एक फुटाणे उंच लाकडाची मचांकडून पक्षी थांबा उपलब्ध करून द्यावा . ४ -अळीच्या प्रादुर्भावाची तीव्रता व पुढचे प्रजनन रोखण्यासाठी हेक्टरी दहा फेरोमेन ट्रॅप हेलिओ ऑथिसच्या ल्युर्स वापरूननिरीक्षणे घ्यावीत . ५ -अळीचे नैसर्गिक भक्षक उदाहरणार्थ क्रायसोपा,लेडी बर्ड बीटल रेडी, रेडू विड ढेकूण यांचे सोंगपणासाठी प्रथमतः रासायनिक किटनाशका वापर करू नये . ६ - घाटे अळीची अंडी नपुसक करण्यासाठी व प्राथमिक अवस्थेतीअळीची भूक मंदावणे साठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझेडेदेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी . ७ - अळया दिसू लागताच एच एन पीव्ही हेक्टरी ५oo अळी क्रश द्वावण प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी . ८ - प्रति मिटर १ अळी किवा ५% घाटे नुकसानग्रस्त झालेनंतर क्विनॉलफॉस २० मिलि किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५% ३gm ची फवारणी करावी .वरील प्रमाणे जैविक सेंद्रीय रासयनिक एकात्मिक नियंत्रण करून ३५% ते ४०% नुकसान टाळण्याचे अहवान सेवारत्न श्री सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी अकलुज ISO 9001:2015 यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा