Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ जानेवारी, २०२५

*तुळजापूर नगर परिषदेचे यात्रा मैदान चोरीला गेले आणि बळकावलेल्या यात्रा मैदानाच्या चौकशीसाठी बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलेल्या संभाजी नेपते यांना तहसीलदारांनी यात्रा मैदान चोरणाऱ्या वर कारवाई करणार असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते स्थगित*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तीर्थक्षेत्र आई तुळजाभवानी च्या पुण्य पावन नगरीत होत असलेल्या जमिनीच्या चोऱ्या उघड होतील का? हा सवाल करून तक्रार करणारे संभाजी शिवाजीराव नेते यांनी दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर जाहीर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते त्याला तुळजापूरचे तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण संभाजी नेते यांनी तात्पुरती स्थगित केले असून १ ते२८ आरोपींना नोटीस काढून 3 फेब्रुवारी रोजी सुनावणीला बोलवले असल्याचे तहसीलदाराने सांगितल्याने तात्पुरते उपोषण मागे घेतले असल्याचे संभाजी शिवाजीराव नेते यांनी सांगितले

याबाबत तुळजापूर नगर परिषदेचे यात्रा मैदान चोरीला गेले होते आणि बाळकावलेल्या यात्रा मैदानाच्या चौकशीसाठी बेमुदतआमरण उपोषण कशासाठी होते याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे


प्राप्त झालेल्या माहिती नुसार तक्रारदार संभाजी शिवाजीराव नेपते राहणार तुळजापूर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे की,तात्कालीन स्थानिक तुळजापूर प्रशासनाने मौजे तुळजापूर शहरांमधील 138 / १ मधील 2 हेक्टर 63 आर एवढी जमीन शासनाने तुळजाभवानी यात्रा मैदानासाठी संपादित केलेले असून त्याचा अंतिम भूसंपादन निवाडा क्रमांक हा १९९१ / एल एन क्यू / सी आर ७७ -सहाय्यक जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी उस्मानाबाद दि.२८/२/१९९८ प्रमाणे करण्यात आला व निवाडा प्रपत्र इ प्रमाणे पंधरा लाख 48 हजार 434 रुपये एवढी भूसंपादनाची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. सदरील यात्रा मैदानासाठीचा भूसंपादनाचा प्रस्ताव हा मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर पत्र क्रमांक / २ / भू स /२ ० / १९९१ दि १६/ ८ /१९९१ अन्वये पाठविलेला असून भूमी अभिलेख कार्यालय उस्मानाबाद यांचे पत्र क्रमांक एल एन क्यू / एस आर / ६० x ९१ प्रमाणे संयुक्त मोजणी अहवाल हि शासनास सादर करण्यात आलेला आहे,

तसेच सदरच्या संपादित जमिनीचा ताबा हा अंतिम निवाडा प्रसिद्ध झाल्यानंतर तत्कालीन तुळजापूर प्रशासनाने घेतलेला आहे परंतू कै. देवीचंद शिवराम जगदाळे त्यांचे कायदेशीर वारस पंडित देवीचंद जगदाळे वे हरिश्चंद्र देवीचंद जगदाळे आणि गंगाधर उर्फे चंद्रभान चव्हाण या व्यक्तीनी स्वताच्या राजकीय ताकतीचा वापर करून जमिनीचा अवैध ताबा घेऊन व सदर सरकारी जमिनीचे बोगस प्लॉटिंग पाडून बोगस एन ए करून करोडो रुपये घेऊन कैक प्लाट विकुन टाकलेले आहेत. व बऱ्याचशा जमिनीवर पत्र्याच्या शेडचे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून आज तागायत करोडो रुपये भाडे खात आहेत.सदर शासनाची जमीन ही तुळजापुरातील अत्यंत मोक्याच्या जागी असून तिचे बाजार भाव कोट्यावधी रुपये आहे परंतु सदरील जमीन शासनाच्या मालकी व वहिवाटीची असताना सुद्धा सदर जमिनीच्या गाव नमुना सात मध्ये (अधिकार अभिलेख पत्र ) मध्ये सरकारने नोंद केलेल नव्हती परंतु गाव नमुना सात मध्ये कब्जेदाची स्वताची नावे असल्याचा गैरफायदा घेऊन शासनाची जमीन फसवणूक करून आपल्या ताब्यात घेऊन त्याचा उपभोग घेत आहेत. बेकायदा कब्जेदार हे नगरपरिषद तुळजापूरचे काही वर्ष नगराध्यक्ष राहिलेले असून त्यांनी आपल्या राजकीय ताकतीचा वापर करून व नगरपालिकेला स्वताच्या इशार्‍यावर नाचवून सदरील जमीन बेकायदेशीर रित्या स्वताच्या ताब्यात घेऊन स्वताचा वैयत्तीक खासगी यात्रा तळ उभा केला आहे. 



 तुळजापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे दररोज भाविक देवीच्या दर्शनाला तुळजापूर शहरात दाखल होतात व प्रत्येक जण चार चाकी वाहनाने येतो त्यांच्याकडून वारेमाप कर वसूल नगर परिषद करते परंतु कायम वाहने रोडवरच रहदारीस अडथळा करीत उभा असतात कारण तुळजापूर नगरपालीकडे मोक्याच्या जागेवर कुठेही पार्किंग साठी जागाच नाही, परंतु प्रत्यक्षात जी जागा यात्रा तळासाठी राखीव / आरक्षीत आहे अश्या जागा या नगरपरीषदेच्या अनागोंदी व भोंगळ कारभारामुळे धनदांडग्या लोकांनी बेकायदा दाबल्या आहेत परंतु याची शिक्षा ही भाविक भक्त आजतागायत भोगतच आहेत. 


 तक्रारदार संभाजी नेपते यांनी या प्रकरणी कैक वेळा नगर परिषद तुळजापूर यांच्याकडे लिखीत तक्रारी केल्या परंतु नगर परीषद प्रशासनाने शकुनी मामाची भुमीका वठवून सदर प्रस्तावीत यात्रा तळ जमीनीचे महाभारत केलेले असून तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात याविरोधात आमरण उपोषण करण्याचा व स्वतःच्या जिवीतास सदर जमीन माफीया लोकांकडुन धोका असल्याचे नमुद केले आहे. 

सदर प्रकरणात शासनाने एक चौकशी समिती नेमलेली आसून सदरच्या समितीमध्ये तहसीलदार, मुख्याधिकारी, मंडळ अधिकारी, पोलीस निरीक्षक इत्यादींची नेमनुक केलेली आहे परंतु सदर समिती ही या प्रकरणात काहीही करत नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केलेला आहे तरी येणाऱ्या काळात प्रशासन काय कारवाई करणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा