*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
समोरून येणारा मोटरसायकल स्वार घसरून पडल्याने त्याला रागावत असताना चुलत भावाने तू कोणाला बोलतोस म्हणून काठीने हातावर पायावर मारहाण करून दमदाटी दिली अशी तक्रार महर्षी नगर यशवंत नगर येथील फिर्यादी सचिन निळकंठ सावंत यांनी अकलूज पोलिसात दिली असून याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती फिर्यादीच्या जबानी पुढीलप्रमाणे
मी सचिन निळकंठ सावंत वय 46 वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर, रा महर्षीनगर यशवंतनगर ता-माळशिरस, जिल्हा- सोलापुर मो.नं- 9730979191 समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब लिहुन देतो की, मी वरील ठिकाणी मी, माझे वडिल निळकंठ, पत्नी सुनंदा, मुलगी-भक्ती असे एकत्रात राहणेस असुन मी सुरेश ताम्हाणे यांचे गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करून कुटुंबाची उपजिवीका भागवितो.
काल दिनांक-24/01/2025 रोजी रात्री 08/30 वा चे सुमारास कामावरुन घराजवळ आलो असता रोडवर एक चारचाकी वाहन उभे होते व त्याचवेळी एक दुचाकी स्वार समोरुन आला त्यावेळी त्याला रस्त्याचा अंदाज न आल्याने तो रोडवर घसरुन पडला. त्यावेळी मी त्याला रागावुन सांगत असताना माझे घराशेजारी राहणारे माझे चुलतभाऊ नागेश बळवंत सावंत व त्यांची दोन मुले अनिकेत व पंकज हे दोघे घराबाहेर आले व तु कुणाला बोलतो असे म्हणून माझ्याशी भांडु लागले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो मी तुम्हाला बोलत नाही तुम्ही माझ्याशी भांडु नका असे म्हणालेवर माझा चुलतभाऊ नागेश याने मला शिवीगाळी करत येवुन तेथे पडलेला दगड हातात घेवुन माझे डोकीत मारला व पुतणे अनिकेत व पंकज यांनी मला हातावर, पायावर काठीने मारहाण करुन दमदाटी करु लागले त्यावेळी मी आरडाओरडा केला असता आमचे शेजारी राहणारे राजेश हेमंत चव्हाण व शेखर हेमंत चव्हाण यांनी येवुन आमची भांडणे सोडविली त्यानंतर मी माझे ईवाई कृष्णा लावंड यांना फोन करून बोलावुन घेतले त्यांनी मला डॉ. देशमुख यांचेकडे उपचाराकरिता घेवुन गेले त्यानंतर मी व माझे ईवाई अकलूज पोलीस ठाणेस आलो व तेथील पोर्लीसांनी मला उपचाराकरिता सरकारी दवाखान्याची यादी दिली मी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेतला. परंतु मला रक्तस्त्राव झाल्याने चक्कर येत असल्यामुळे मी घरी गेलो व आज बरे वाटु लागल्यामुळे पोलीस ठाणेस तक्रार देण्यासाठी आलो आहे.
तरी दिनांक-24/01/2025 रोजी रात्री 08/30 वा चे सुमारास मी कामावरुन घराजवळ आलो असता रोडवर एक दुचाकी स्वार समोरुन आला त्यावेळी त्याला रस्त्याचा अंदाज न आल्याने तो रोडवर घसरुन पडल्याने मी त्याला रागावून सांगत असताना माझे घराशेजारी राहणारे माझे चुलतभाऊ 1) नागेश बळवंत सावंत व त्याची दोन मुले 2) अनिकेत नागेश बळवंत 3) पंकज नागेश बळवंत सर्व रा महर्षीनगर यशवंतनगर ता-माळशिरस, जिल्हा-सोलापुर हे घराबाहेर आले व तु कुणाला बोलतो असे म्हणुन माझ माझ्याशी भांडु लागले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो मी तुम्हाला बोलत नाही तुम्ही माझ्याशी भांडु नका असे म्हणालेवर माझा चुलतभाऊ नागेश याने मला शिवीगाळी करत येवून तेथे पडलेला दगड हातात घेवुन माझे डोकीत मारला व पुतणे अनिकेत व पंकज यांनी मला हातावर, पायावर काठीने
मारहाण करुन दमदाटी केली. म्हणुन माझी त्य'चेविरुध्द तक्रार आहे. माझा वरील संगणाकावर टंकलिखीत केलेला फिर्यादी जबाब मी वाचुन पाहिला तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे./
याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात आरोपी १)नागेश बळवंत सावंत २) अनिकेत नागेश बळवंत ३) पंकज नागेश बळवंत राहणार महर्षी नगर यशवंत नगर ता.माळशिरस जि. सोलापूर यांच्या विरोधात -भारतीय न्याय संहिता (बी. एन एस)२०२३-१२८(१)/३५२ /३५१ (२)/३५१(३)/३(५) प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा