*नळदुर्ग --प्रतिनिधी*
*रहेमान- शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
१
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५२ नळदुर्ग-अक्कलकोट मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाच्या आदेशाचा अवमान करुन अर्टिकल 300A चे उल्लंघन करुन Private Property is Fundamental Rights Suprime Coart सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचा अवमान करीत शेतकऱ्यांनवरती पोलीस बळाचा वापर करुन त्यांच्या मालकी हक्काच्या जमीनी संयुक्त मोजणी अहवालामध्ये बाधित झालेल्या असाताना शेतकऱ्यांन मध्ये मितीचे वातावरण निर्माण करुन मा. संतोष राऊत (उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव) मा. एस.एन. शेळके (कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर), मा. संतोष देशमुख (उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर), मा. अरविंद बोळंगे (तहसिलदार तुळजापूर), मा. गजेंद्र सरोदे (तात्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, नळदुर्ग), व एन.डी. राजगुरु (कनिष्ठ अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सोलापूर) यांनी संगनमाताने अचानकपणे पोलीस बळाचा वापर करुन शेतकऱ्यांनमध्ये भिती निर्माण करुन दि. ०७/०२/२०२५ रोजी मौजे गुळहळ्ळी ता. तुळजापूर येथील रस्त्याच्या कामासाठी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाच्या दि. ०४/०२/२०२५ रोजीच्या आदेशात कोणत्याही प्रकारच्या कामासाठी परवानगी नसताना समस्त अधिकाऱ्यांनी मिळून पोलीस बळाचा वापर करुन शेतकऱ्यांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करावे अन्यथा दि. २८/०३/२०२५ वार शुक्रवार रोजी निवेदना वरती स्वाक्षरी केलेले शेतकऱ्यान वरील अन्याया विरोधात "नरीमन पॉईंट" मुंबई येथील समुद्रात सकाळी ११ वा. जलसमाधी आंदोलन करणार असले बाबत.
२)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ नळदुर्ग ते अक्कलकोट या संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर या खंडपीठाने दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी दिलेल्या आदेशातील परिच्छेद क्रमांक १३ व १४ नुसार मा. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी मा. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धाराशिव यांनी भूसंपादन प्रक्रिया सुरु करणे अपेक्षित होते. मा. जिल्हा अधिकारी साहेब धाराशिव यांनी दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी मा. उच्च न्यायालय छत्रपती संभाजी नगर (तात्कालीन औरंगाबाद) खंडपीठासमोर दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये EX4-R-8-464 या निशानी नुसार मा. कार्यकारी अभियंता श्री. सदाशिव निवृत्ती शेळके साहेब (राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर) यांनी मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांना दि. ३१/०१/२०२४ रोजीच्या लिखीत पत्राद्वारे या संदर्भीय रस्त्यामध्ये कि.मी. ३०+८८४ ते ७०-७०९ या मंजूर कामापैकी उर्वरीत लांबीत कोणत्याही प्रकारचे काम हाती घेण्यात येणार नाही असे हमी दिली होती.
दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी मा. उच्च न्यायालय मुंबईचे औरंगाबाद खंडपीठ यांनी दि. २०/०१/२०२२ रोजी रीट पिटीशन क्रमांक ४०२२ मधील पॅरा १३ व १४ चे पालन करण्याचे आदेशित केले होते. यात कुठेही शंका नसतांना दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री. सदाशिव निवृत्ती शेळके (कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर) यांनी लिखीत स्वरुपात मा. श्री. संतोष राऊत (उपविभागीय अधिकारी धाराशिव) यांच्याकडे रस्ता दुरुस्ती दरम्यान शेतकरी अडथळा करीत असल्या कारणाने पोलीस बंदोबस्त मिळणेसाठी अर्ज केला मा. उपविभागी अधिकारी, धाराशिव यांनी त्याच दिवशी सदरील अर्ज शिफारशीसह आवश्यक त्या कार्यवाहीसाठी मा. पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र सरोदे साहेब (नळदुर्ग पोलीस ठाणे) यांनी त्याच दिवशी सकाळी १० वा. दरम्यान शिघ्न कृतीदल (पोलीस) धाराशिव यांचे १० ते १५ पोलीस, नळदुर्ग पोलीस ठाणे येथून पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र सरोदे साहेब व त्यांचे १० पोलीस कर्मचारी व ५ महिला पोलीस कर्मचारी, तसेच विभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर श्री संतोष देशमुख साहेब हे अक्कलकोट तुळजापूर सिमेवरील गुळहळ्ळी या गावात तैनात होते.
श्री.एन.डी. राजगुरु साहेब (कनिष्ठ अभियंता) हे रा. महामार्ग विभाग सोलापूर हे आपल्या कर्मचाऱ्यासह हजर होते. या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सुचना दिली गेली नव्हती, संबंधीत शेतकऱ्यांना ही बाब समजताच ४० ते ५० शेतकरी गोळा झाले, त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष देशमुख साहेब यांनी शेतकऱ्यांना दमदाटीची भाषा वापरली "जास्त अगावपना करायचा नाही अन्यथा तुम्हाला पोलीशी खाक्या दाखविले जाईल" अशी धमकी दिली, त्यांनी पोलीस बळाचा वापर करुन दहशत निर्माण केली, घाबरलेल्या शेतकऱ्यांनी मौजे शहापूर ता. तुळजापूर या जवळच असलेल्या साठवण तलावात सुमारे ७ ते ८ शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले. याप्रकरणाची माहिती मिळताच मा. उपविभागी अधिकारी तुळजापूर श्री. संतोष राऊत साहेब व मा. तहसिलदार मा. अरविंद बोळंगे साहेब हे साधारणे दु. ०१ वा. दरम्यान्य आंदोलन स्थळी आले. दोघांनीही शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला व दि. १०/०२/२०२५ रोजी सर्व संबंधीताची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आयोजित केली. या बैठकीला संबंधीत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र श्री. सदाशिव निवृत्ती शेळके साहेब (कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५२ विभाग सोलापूर) यांनी बैठकीसाठी स्वतः उपस्थित राहणे बाबत सुचना देण्यात
येऊन सुध्दा ते हेतूपुर्वक उपस्थित राहिले नाहीत. मा. स. नि. शेळके साहेब हे शेतकऱ्यांन वरील पुर्वगृहीत द्वेशामुळे शेतकऱ्यांना मुद्दाम त्रास देणे, इतर विभागातील अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणे शेतकऱ्यांनवर खोटे गुन्हे नोंद करुन दहशत निर्माण करीत
पान नं.२
१
३
आहेत. गेल्या ६ वर्षा पासून मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात आर्थिक स्वखर्चाने न्यायालयिन लढा लढत असून त्यामुळे शेतकरी व शेतकरी कुटूंबाना इतर प्रकारे त्रास देत असून त्यांना सर्व बाधित शेतकरी दडपणाखाली जीवन जगत आहेत. अनेक शेतकरी व कुटूंबाना रक्तदाब, मधुमेह या सारखे विकार जडले आहेत. मौजे चुंगी ता. अक्कलकोट येथील बाधित शेतकऱ्यांनवरती खोट्या पोलीस केस केलेले शेतकरी मा. न्यायालयातून निर्दोष मुक्त झाल्या नंतर श्री. शेळके साहेब व इतर आधिकारी यांच्या विरोधात अबु नुकसानीचा दावा मा. दिवाणी न्यायालय, सोलापूर येथे १० लाख रुपयाचा दावा दाखल केलेला आहे. दि. ०५/१०/२०२४ रोजी दाखल केला आहे.
मा. न्यायालयाच्या आदेशानुसार मा. उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, अक्कलकोट यांचे मार्फत मोजणी करीत असताना मा. कार्यकारी अभियंता हे आपल्या कर्मचाऱ्या मार्फत नियमाविरुध्द वारंवार आक्षेप घेऊन संबंधीत मोजणी कर्मचाऱ्यांनवरती चुकीच्या पध्दतीने मोजणी करण्यासाठी दबाव आणत आहेत. श्री.एन.डी. राजगुरु, कनिष्ठ अभियंता हे सर्व संबंधीत कार्यालयांना चुकीची माहिती पुरवून शेतकऱ्यांनवरील आकसापोटी वागत आहेत. त्यामुळे सर्व संबंधीता मध्ये गैरसमजूत पसरवून वारंवार वाद विवादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
वरील सर्व अधिकारी व प्रशासनातील व्यक्तिच्या वर्तवणुकीमुळे आम्ही व्यथित झालो असून आपण वरील सर्व अधिकारी विशेषता श्री. शेळके साहेब (कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर) श्री. संतोष देशमुख साहेब (उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर) श्री. गजेंद्र सरोदे साहेब (पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, नळदुर्ग), श्री. संतोष राऊत साहेब (उपविभागीय अधिकारी, धाराशिव), श्री. अरविंद बोळंगे साहेब (तहसिलदार तुळजापूर) व श्री. एन.डी. राजगुरु (कनिष्ठ अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सोलापूर) या अधिकाऱ्यांनी संगनमत करुन शेतकऱ्यांच्या जमीनी कोणताही मोबदला न देता बळकविल्या असून अर्टिकल 300-A चे उल्लंघन केले आहे.
आम्ही अशी मागणी करतो की, वरील सर्व अधिकाऱ्यांनवरती निलंबनाची कार्यवाही तात्काळ आपल्या स्तरावरुन आदेश निर्गमित करावे अन्यथा आम्ही सर्व बाधित शेतकरी दि. २८/०३/२०२५ वार शुक्रवार रोजी "नरीमन पॉईंट" मुंबई या ठिकाणी सकाळी ११.०० वाजता जलसमाधी आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी हि नम्र विनंती.
कळावे आपला
दिलीप जोशी
(समन्वयक शेतकरी संघर्ष समिती)
सरदारसिंग रामसिंग ठाकूर
(जिल्हाध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती धाराशिव)
व्यंकट हरिदास पाटील
(तालुकाध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती)
याची प्रत :
१) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई-३२
२) मा. प्रतापजी सरनाईक साहेब, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव.
३) मा. भास्करजी जाधव साहेब, विधानसभा विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र मंत्रालय, मुंबई-३२
४) मा. अंबादासजी दाणवे साहेब, विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधान परिषद, मंत्रालय, मुंबई-३२
५) मा. विभागीय आयुक्त साहेब, छत्रपती संभाजी नगर.
६) मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब छत्रपती संभाजी नगर.
७) मा. जिल्हाधिकारी साहेब, धाराशिव.
८) जिल्हा पोलीस अधीक्षक धाराशिव
पान-३
४
सोबत विविध प्रती जोडलेले आहेत
१) मा. मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजी नगर खंडपीठ दि. २०/०१/२०२२ रोजी दिलेल्या निकालाची प्रत.
२) मा. उच्चन्यायालय, मुंबईचे छत्रपती संभाजी नगर खंडपीठ यांचे दि. ०४/०२/२०२५ रोजी व दि. १८/१०/२०२२ रोजीच्या आदेशाचे पत्र.
३) मा. पोलीस ठाणे नळदुर्ग यांचे दि. ०३/०३/२०२५ रोजीच्या माहितीची प्रत.
४) मा. जिल्हा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांचे दि. ०७/०२/२०२५ व दि. १२/०२/२०२५ रोजीच्या बैठकी संदर्भातील पत्र.
५) शेतकरी संघर्ष समिती यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना दि. ०३/०६/२०२४, व दि. १७/०२/२०२५ रोजी दिलेले पत्र.
६) राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांचे दि. २२/११/२०२३ रोजी जिल्हा अधिक्षक, भूमिअभिलेख कार्यालय, सोलापूर यांना दिलेले पत्र.
७) राष्ट्रीय महामार्ग सोलापूर यांचे दि. ३१/०१/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांना दिलेले हमीपत्र.
८) मा.श्री. एन.डी. राजगुरु, कनिष्ठ अभियंता यांचे मा. कार्यकारी अभियंता सोलापूर यांना दि. ३०/०९/२०२२ रोजीचे पत्र.
९) मा. राष्ट्रीय महामार्ग विभाग, सोलापूर यांचे उपअधिक्षक भूमिअभिलेख, अक्कलकोट यांना दि. ३०/०९/२०२२ रोजी चे पत्र.
१०) उपअधिक्षक भूमिअभिलेख यांचे शेतकरी संघर्ष समिती अक्कलकोट यांना दि. ०२/१०/२०२२ रोजीचे पत्र.
११) उपअधिक्षक भूमिअभिलेख अक्कलकोट यांचे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांना पत्र दि. २३/०४/२०२४.
१२) Special Civil Suit, क्रमांक १२/२०२५ जिल्हा दिवाणी न्यायालय, सोलापूर मधील याचिकेची प्रत.
१३) दि. ०७/०२/२०२५ रोजीच्या कार्यवाहीची फोटो प्रत.
१४) मा सर्वोच्च न्यायालय यांचे दि. ०६/११/२०२४ रोजी भूसंपादन प्रकरणातील मनोज तिवारीवाल, आकाश या प्रकरणा मधील दिलेले निर्देश.
१५) Private Property in a Fundamental Rights सर्वोच्च न्यायालय.
१६) मा. आनंद कांगुले सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नळदुर्ग यांनी
दि. २१/०९/२०२४ रोजी दिलेले समजपत्राची प्रत. तसेच दि. २८/०५/२०२४ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नळदुर्ग यांनी दिलेल्या शेतकऱ्यांना समजपत्राची प्रत.
१७) दि. ०३/११/२०२२ रोजी मा. पांडुरंग कुळकर्णी (पुर्नवसन) औरंगाबाद यांनी मा.
पान ४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा