*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी वयाच्या फक्त ७६ वर्षी लेझीम खेळाचा मनमुराद आनंद घेत तरूणांना लाजवेल असा लेझीमचा खेळ करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित केल्या होत्या.त्यामुळे मदनदादांनी या वयात ग्रामीण भागातील लेझीम खेळाचा खराखुरा आनंद या वयात घेतला.
अकलूज येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नातू व आ.रणजितसिंह मोहिते- पाटील यांचे चिरंजीव विश्वतेजसिंह मोहिते-पाटील यांचा शाही विवाह अकलूज येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी लग्नाचा वरदावा काढण्यात आला होता.यामध्ये शंकरनगर येथील अर्जुनसिंह मित्र मंडळ लेझीम संघाच्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.यामध्ये आघाडीवर मदनसिंह मोहिते-पाटील होते. त्यांनी ग्रामीण भागातील लोकप्रिय लेझीम खेळ खेळत.या खेळाचा मनमुराद आनंद घेतला. त्यांनी जॅकेट,नेहरू शर्ट,पायजमा कोल्हापुरी फेटा परिधान केला होता.या वयात ही लेझीम खेळताना त्यांच्यातील चपळता व खिलाडूवृत्ती यामुळे सर्वांच्या नजरा मदनसिंह मोहिते-पाटील यांच्यावर खेळून होत्या.
आजकालच्या जमान्यात वरदाव्यात डाॅल्बीच्या तालावर तरूणाई बेधुंद नृत्य करताना दिसत असताना.अकलूजच्या मोहिते पाटील परिवाराने आज ही पारंपारिक लेझीम खेळ जतन केला आहे.या वरदाव्याचे नेतृत्व युवा नेते पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील करत होते.सदुभाऊ चौकातून वरदावा निघाला होता.अनेक नेते मंडळांनी या वरदाव्यात सहभाग घेतला होता.मोठ्या जोशात विश्वतेजसिंहाची घोड्यावरून वरात निघाली होती.या लेझीम संघात ७६ वर्षाचे सोलापूर जि.प.चे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील मोठ्या जोशात लेझीम खेळत होते.राजबिंडे रूबाब मदनदादांना दृष्ट लागावा असा होता.लेझीम खेळताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.लेझीम खेळतानाची पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यात व्हायरल होताच. जिल्हातील अनेक चाहत्यांचे मदनदादांना फोन करून शुभेच्छा दिल्या.तरुणांना लाजवेल अशी जिद्द व तारूण्य आज ही मदनदादा यांच्यात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा