Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २४ मार्च, २०२५

*गोकुळ शुगर दत्तनगर धोत्री कारखान्याने दोन दिवसात एफ आर पी परमाने ऊस बिल न दिल्यास कारखान्यासमोर सामुहिक आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

गोकुळ शुगर दत्तनगर धोत्री साखर कारखान्याने दोन दिवसात एस आर पी प्रमाणे ऊस बिल न दिल्यास सह्या करणारे शेतकरी कारखान्याच्या गेट समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभाग यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की

, आम्ही खालील सह्या करणारे सर्व शेतकरी राहणार वागदरी तालुका तुळजापूर येथील रहिवासी असून आमचा ऊस श्री गोकुळ शुगर दत्तनगर धोत्री.. येथे 2024 2025 या गळीत हंगामामध्ये गळितासाठी पाठवला होता त्याचे अद्याप एफआरपीप्रमाणे अजून बिल जमा आले नाही ऊस दिलाची मागणी केली असल्या असताना संबंधित कारखान्याचे अधिकारी चेअरमन हे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस कारखान्यावरून मानहानी आणि मनस्ताप सहन करून परत यावे लागत आहे. आम्हा शेतकऱ्यांची शेतकऱ्याची संपूर्ण आर्थिक देवाणघेवाण हे या ऊस बिलावरती अवलंबून आहे


सध्या बाजारामध्ये आम्हा शेतकऱ्यांची कोणतीही पत चालत नाही खत दुकानदार, औषध दुकानदार, दवाखाने, आरोग्य मुलांच्या शाळेची फीस हे सर्व देणे बाकी आहे. ऊस बिल न दिल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे हे ऊस बिल आम्हाला एक दोन दिवसात नाही मिळाले तर आमच्या पुढे आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. आम्हाला दोन दिवसात एफ आर पी प्रमाणे ऊस बिल देण्यात यावे अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी तरी देण्यात यावी ही आम्ही खालील शेतकरी आपणास विनंती करीत आहोत...



दोन दिवसात ऊस बिल जमा न झाल्यास कारखान्यासमोर सामुहिक आत्मदहन करण्यात येईल याची गांभीर्यपूर्वक नोंद घेण्यात यावी असाही इशारा निवेदनात दिला आहे


माहितीस्तव निवेदनाची प्रत


1) सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य


2) साखर आयुक्त पुणे


3) जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर


4) जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव


5) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर


6) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव


यांना पाठवण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा