*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर शहरालगत धाराशिव छत्रपती संभाजीनगर (हायवे लगत असणारे स.नं.१३८, १३९) या ठिकाणी यात्रा मैदानासाठी दि. २८/०२/१९९८ या तारखेला २ हे ६३ आर इतकी जमीन भूसंपादन झालेली आहे, त्या भूसंपादीत शासनाच्या जागेवर बळजबरीने कपटनितीने व संगनमताने बोगस लेआऊट क्षेत्रात झालेले बोगस लेआऊट रद्द करून कायदेशीर कार्यवाही करून त्या ठिकाणी भाविकांसाठी यात्रा मैदान होणेबाबत व महसूल दप्तरी महाराष्ट्र शासन याची नोंद घेणेबाबत.
तुळजापूर येथील सर्व महिला भाविक व पुजारी बांधव, यांनी मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी धाराशिव रोडवर रास्ता रोको करून धाराशिव जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले याप्रसंगी या संदर्भात लवकरच हा प्रश्न सोडवा असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्याने रास्ता रोको स्थगित करण्यात आले
याबाबत सविस्तर माहिती व मागणी अशी की
तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे. त्या ठिकाणी स.नं. १३८/१ या क्षेत्रावर तुळजापूर येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शासनाने दि २८/०८/१९९८ या तारखेला हे भूसंपादन केलेले असताना या क्षेत्रावर तुळजापूर नगर परिषदेच्या मा. नगरसेवकाने (मा.उपाध्यक्ष) यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर संगनमताने लेआऊट तयार करून ती जमीन विक्री करून गिळकृत केलेली आहे. जया उद्देशाने हे भूसंपादन झालेले आहे, तो शासनाचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही.
तसेच तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांच्या जिव्हाळयांचा व भावनेचा प्रश्न आहे. भाविक भक्तांना या ठिकाणी सोईचे होईल व जवळच ५०० मीटर अंतरावर देवीजचे मंदिर आहे. भाविकाची सोय होती आणि किती जरी भाविक आले तरी यात्रा मैदानात गाडया लागू शकतात, तरी लवकरा लवकर संबंधितावर कारवाई करून वरील सर्वे नंबरच्या महसूल दप्तरी महाराष्ट्र शासन याची नोंद घेण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
टिप :- आज दिनांक २०/०३/२०२५ रोजी अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासन असे नाव लावण्याचे आदेश न दिल्यामुळे दि. २५/०३/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मलबा हॉस्पिटल यात्रा मैदानासमोर व पाकींग येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तरी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी या विषयाची तात्काळ दखल घेवून निकाली काढावे अशीही मागणी करण्यात आली आहे
माहितीस्तव प्रत
१) मा. पोलिस अधिक्षक, धाराशिव
२) मा. तहसिलदार, तहसिल कार्यालय, तुळजापूर
३) मा. पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन, तुळजापूर
मा. मुख्याधिकारी, नगर परिषद तुळजापूर
| जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा