Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ मार्च, २०२५

ॲड.फरहीन खान महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

ॲड.फरहीन खान व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा या ठिकाणी अधिवक्ता आहे.सन 2012 पासून त्या वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत.कायदेविषयक शिबिरामार्फत ,सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे कार्यक्रम अंगणवाडी,शाळा, महाविद्यालय, बचत गटातील महिलांचे कार्यक्रम तसेच महिलांशी संबंधित इतर कार्यक्रम अश्या सर्व प्रकारच्या वरील घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे हक्क जबाबदाऱ्या तसेच उज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये सक्षमीकरण , सशक्तिकरण, सबलीकरण आणि जागरूकता आणण्याचे कार्य करीत असतात तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लेख, व्याख्यान माध्यमातून त्यांचे विचार जन माणसापर्यंत पोहोचविणे व विविध विषयावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत असतात.तसेच विविध विषयांवर स्वरचित काव्य लेखन करून आपले विचार मांडत असतात. त्यांच्या कविता दै.साहित्य तेज ,अव्यक्त अबोली साप्ताहिक,वल्ड व्हिजन टाइम्स मुंबई इ.वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या आहेत.त्यांच्या कार्यांची दखल घेऊन सामाजिक सेवा गौरव पुरस्कार,वनश्री पुरस्कार, ग्रामपंचायत कार्यालय दाबकाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार काव्य लेखन ई- पुरस्कार,लेखणी रत्न साहित्य ई- पुरस्कार तसेच राज्यस्तरीय महाराष्ट्र युवा नारीशक्ती भूषण पुरस्कार राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार ,युगस्री फातिमाबी समाज भूषण पुरस्कार प्राप्त झालेले.



रविवार दिनांक 9/ 2 /2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन (रजि) भारत सरकार प्रमाणित शहीद स्मारक सभागृह रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व मुंबई 75 यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यचा गौरव म्हणून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आले होते. फाउंडेशनचे संस्थापक सुधीर कांबळे ऍड.अजय तापकीर (प्रहार शक्तिपक्ष) विजय पाटकर (सिने अभिनेता दिग्दर्शक निर्माता) उत्तमराव तरकसे (मुंबई क्राईम ब्रँच)रंजना पाटील सिने अभिनेत्री दिगंबर कोळी (सिने अभिनेता) इ. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून 

वंदन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात झाली वरील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ॲड.फरहीन खान-पटेल यांना महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सोनाली सुतार तसेच सागर वाघमारे यांनी सूत्रसंचालन उत्तम रीतीने पार पाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा