अभंग
*डाॅ.बाबा साहेब आंबेडकर*
खूप गरीबीत ।घेतले शिक्षण
बाहेर बसून ।भीमराया॥१॥
शिकण्याची आस।नडली त्या जात
तरी केली मात।साहेबांनी॥२॥
धरला आग्रह।समाजसुधार
स्त्रियांचे उध्दार।मुक्तिसाठी॥३॥
दूर केला भेद ।खुले केले त्यांनी
महाडचे पाणी ।चवदार॥४॥
स्विकारला धम्म!। शांती समतेचा
मानवी मुल्यांचा ।अखंडीत॥५॥
न्याय मिळवण्या।जहाली स्थापन
ती रिपब्लिकन।पीडितांना॥६॥
महामानवाने ।निर्मिला उत्तम
जगी सर्वोत्तम।संविधान॥७॥
दिली त्यांनी आम्हा।समता बंधूता
आणि समानता ।सुरक्षित॥८॥
सर्वांना जगण्या। दिला अधिकार
झाले शिल्पकार।घटनेचे॥९॥
जगतात श्रेष्ठ।आहे संविधान
सर्वांना समान।न्याय हक्क॥१०॥
धर्म निरपेक्ष।राष्टीृय एकता
आणि अखंडीता।भारताची॥११॥
मानव धर्माचे ।अमृत पाजले
श्रेष्ठ ते ठरले।जगतात॥१२॥
प्रणाम करते।कोटी कोटी त्यांना
दिले बहुजना।अधिकार॥१३॥
*अनिसासिकंदर, दौंड*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा