Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि 'महात्मा ज्योतिबा फुले' यांची संयुक्त जयंती श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ समितीच्या वतीने उत्साहात साजरी*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

अखंड विश्वाला मानवतावादी दृष्टिकोन देऊन अस्पृश्य समाजाला मानवरुपी आत्मभान प्रदान करणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व नुकतीच संपन्न झालेली महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचा *संयुक्त जयंती समारंभ* श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ समिती, अकलूजच्या वतीने श्री लक्ष्मी बालाजी हाॅल, अकलूज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तदनंतर उपस्थित सर्व चर्मकार समाजबांधवांनी अकलूज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. या प्रसंगी भारतीय संरक्षण दलातील सेवानिवृत्ती मेजर श्री सोमनाथ महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मेजर महाजन यांनी आपल्या भारतीय सैन्य दलातील सेवाकार्यातील आपले अनुभव व्यक्त करुन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेतून समता आधारित समाजाच्या विचाराचे माॅडेल नव-महाराष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण समाजाने या महापुरुषांच्या विचारधारेचे आचरण करुन मानवता धर्म वृद्धिंगत करावा असा संदेश या प्रसंगी उत्स्फूर्त मनोगतातून व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी ॲड. भारत गोरवे, पोलीस पाटील शंकर बागडे, डॉ.निवृत्ती लोखंडे यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून राजाराम गुजर यांनी महापुरुषांच्या जयंती उत्सवाचे औचित्य आणि महत्व विषद करून सर्व महापुरुषांना आदरांजली वाहिली व या कार्यक्रमाचे अतिशय समर्पक सूत्रसंचालन केले. आभार डॉ.निवृत्ती लोखंडे यांनी मानले.



या प्रसंगी डॉ..दिलीप गुजर, आबासाहेब शिंदे, राजाराम गुजर, गोपाळ मस्तुद, महादेव राजगुरू, शंकर बागडे, भारत गोरवे, अशोक कांबळे, गोपाळ गुजर, श्रीमंत भगत, मोहन भगत, शंकर बामणे, अशोक राजगुरु, मेजर सोमनाथ महाजन इत्यादी समाजबांधव बहुसंख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा