*उपसंपादक --नूरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. "कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटील की ?" तसेच "कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करणार का ?" अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, युवा सेनेने याचा तीव्र निषेध केला आहे.
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संगम येथे कृषिमंत्र्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात प्रतिकात्मक गाढवाच्या गळ्यात कृषिमंत्र्यांचे पोस्टर लावून आणि "मी हिटलर कृषिमंत्री", "मी गाढव कृषिमंत्री " असे बॅनर लावून निषेध व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे प्रतिकात्मक गाढवावर कृषिमंत्र्यांना बसवले असल्याचे पोस्टरही लावण्यात आले, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.यावेळी बोलताना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,अशी मागणी केली. "शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना आम्ही राज्यभर फिरू देणार नाही," असा इशाराही युवा सेनेने दिला आहे.यावेळी युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता भाऊ साळुंखे,संगमचे माजी सरपंच रमेश इंगळे,नागनाथ महाडिक पाटील,प्रशांत पवार,रज्जाक मुलाणी,ओम पराडे,अक्षय पराडे,अप्पा महाडिक,विकास भोई,जोतिराम पराडे,सयाजी मस्के,दीपक भोई,शुभम भोई, आदित्य भोई,ऋषी चव्हाण,गोटू पराडे,मधुकर बंडलकर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा