*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
मुंबई : राज्यातील बहुतांश भागांत आजपासून (३ मे) चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर दुसरीकडे राज्यात उन्हाची तिव्रता कमी झालेली नाही. राज्यात उष्णतेच्या लाटा दिसून येत आहेत. शुक्रवारी अकोला, जळगाव, सोलापूर येथील कमाल तापमान 44, तर पुणे शहरात यंदाच्या मे महिन्यातील विक्रमी 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, उत्तर भारतात आणि जम्मू आणि काश्मिरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. तसेच उष्ण हवामानापासून किंचित दिलासाही मिळाला आहे. उत्तर भारतात तापमान कमी झाल्याने आता महाराष्ट्रातही पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शहरांमधील शुक्रवारचे कमाल तापमान
अकोला 44.5, जळगाव 44.2, सोलापूर 44.1, पुणे (लोहगाव 43, शिवाजीनगर 41.2), मुंबई (कुलाबा) 34.1, सांताक्रूझ 33.9, अलिबाग 35.7, रत्नागिरी 33.5, कोल्हापूर 38.5, महाबळेश्वर 33.1, मालेगाव 42.2, नाशिक 40, सांगली 41, सातारा 41.2, धाराशिव 42.4, छ. संभाजीनगर 42, परभणी 41.6, बीड 42.9, अमरावती 42.8, बुलडाणा 40.8, ब्रह्मपुरी 42.2, चंद्रपूर 41.8, गोंदिया 37.9, नागपूर 41.6, वाशिम 42.असे आहेत पावसाचे यलो अलर्ट
असे आहेत अलर्ट
कोकण (5 ते 8 मे)
मध्य महाराष्ट्र (3 ते 8 मे)
मराठवाडा (3 ते 8 मे)
विदर्भ (3 ते 6 मे)6, वर्धा 42.1, यवतमाळ 41.6
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा