*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी.फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व महाविद्यालय विकास समितीचे सभापती विनोदकुमार दोशी,संचालक व सदस्य रामचंद्र गायकवाड व सचिव अभिजीत रणवरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात कै.सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील व अक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल भानवसे यांनी केले.
निरोपाच्या प्रसंगी अंतिम वर्षातील विद्यार्थी चि.गौरव दुधाट व कु.श्रद्धा ढवळे आणि तृतीय वर्षातील कु.स्नेहा शिनगारे,चि. आर्यन घाडगे व कु.अक्षदा एकशिंगे आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या व भविष्यातील उपलब्ध संधी बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शैक्षणीक वर्ष २०२४-२५ मधील विद्यापीठ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, वार्षिक क्रीडा सप्ताहातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि.श्रीप्रसाद कुलकर्णी आणि कु. प्रियंका कुलकर्णी यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा