*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
बारुळ ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेत अध्यापन करत असलेले विज्ञान पदवीधर शिक्षक "अमिन मुलाणी" यांना जिल्हा आदर्श पुरस्कार व शाळेला उत्कृष्ट शाळा पुरस्काराने जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने सन्मानित. करण्यात आले जिल्हा परिषदे कडून देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात आले. जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये जिल्हाभरातून प्राथमिक व माध्यमिक असे एकूण 34 आदर्श शिक्षक पुरस्कार, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार, आदर्श शाळा व्यवस्थापन समिती पुरस्कार, उत्कृष्ट शाळा पुरस्कार, माझा वर्ग माझी जबाबदारी पुरस्कार, वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या शुभहस्ते तर शिक्षणाधिकारी (मा) श्रीम. सुधा साळुंके, शिक्षणाधिकारी (प्रा) अशोक पाटील ,डायटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत एक मे या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात दुपारी 2.00 वाजता शेकडो शिक्षक, संघटना पदाधिकारी व समर्थकांच्या उपस्थितीत सन 2022 ते 23 पासून म्हणजे गत तीन वर्षापासून रखडलेला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उत्कृष्ट शाळा पुरस्कार म्हणून जिल्हा परिषद बारूळ शाळेला सन्मानित करण्यात आले.तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारात प्राथमिक विभागात बार्शी तालुक्यातील कारी गावचे रहिवासी असलेले मात्र तुळजापूर तालुक्यात बारूळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विज्ञान पदवीधर पदावर कार्यरत असलेले अमिन जहिरुद्दीन मुलाणी यांना सन २०२३-२४ या वर्षीच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवराच्या हस्ते शाल, फेटा, सन्मानचित्र, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी त्यांच्या सौभाग्यवती गुलबदन मुलाणी ,त्यांचे वडील जहिरुद्दीन मुलाणी, भाऊ शिराज मुलाणी,यांच्यासह केंद्रप्रमुख श्रीहरी लोखंडे,बारूळ शाळेतील मुख्याध्यापक सौदागर शेख,सहकारी शिक्षक वृंद बालाजी पवार, रूपाली गडेकर,कल्पना चव्हाण, बारुळ गावचे सरपंच शहाजी सुपनार, शाळा व्य.समिती अध्यक्ष मन्मथ ठोंबरे,सुरेश ठोंबरे, गणपती कुंभार, पोलिस पाटील शिवाजी सगर,रणजीत सगर,शिवाजी नवगिरे, कमलाकर ठोंबरे,अनिल यावलकर,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य नेते बशीर तांबोळी, अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, शिक्षण समितीचे राज्य नेते कल्याण बेताळे, एकल शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष पवन सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बिभीषण पाटील, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, काक्रंबा बीटचे विस्ताराधिकारी मल्लिनाथ काळे, मंगरूळ बीटचे विस्ताराधिकारी मल्हारी माने, अणदूर बीटचे विस्ताराधिकारी तात्यासाहेब माळी, काक्रंबा केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीहरी लोखंडे आदीसह जिल्ह्यातील सहशिक्षक, हितचिंतक, मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते. अमिन मुलाणी यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार व शाळेला उत्कृष्ट शाळा पुरस्कार मिळाल्याने दुग्ध शर्करायोग साधून आल्याने सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा