Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ जून, २०२५

*श्रीपुर येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025/ 26 मिल रोलर पूजन संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष कैलास खुळे, उमेशराव परिचारक, सर्व संचालक व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी तसेच अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले, कारखान्याकडे गळीत हंगाम

२०२५-२६ साठी सुमारे ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्राच्या ऊस नोंदी आहेत. त्यामधून उपलब्ध होणाऱ्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्यात येईल.

कारखान्यामार्फत उत्पादकांसाठी ऊस विकासाच्या विविध योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून, त्याद्वारे शेतकऱ्यांनी सुधारित ऊस बेणे लागवड

करून उत्पादनामध्ये वाढ साधली आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेता यावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, यासाठी नुकतेच

ए.आय. तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याचा प्रसार कारखानास्तरावरून करण्यात येत असून, ही योजना कारखाना, शेतकरी व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, बाळासाहेब यलमर, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, श्यामराव साळुंखे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा