**संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेचा 'इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड' जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २५ जुलै २०२५ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. डॉ. कुलकर्णी यांनी २०१४ साली कार्यकारी संचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या १२ वर्षांमध्ये सातत्याने उल्लेखनीय नेतृत्व करत कारखान्याला प्रगतिपथावर नेले आहे. त्यांच्या कार्यकाळात कारखान्याचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झाले असून, सध्या प्रतिदिन सुमारे १० हजार मे. टन गाळप क्षमतेने गाळप केले जात आहे. तसेच ९० के.एल.पी.डी. क्षमतेचा आसवनी प्रकल्प आणि ३२ मेगावॉट क्षमतेचा को जनरेशन प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहेत.
साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. यशवंत कुलकर्णी यांचे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष कैलास खुळे यांच्यासह संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा