Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ जून, २०२५

*कोणाचा शिवसेना वर्धापन दिन ठरला सरस?* *उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेचा?*पहा youtube लाईव्ह आकडेवारी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

शिवसेनेत फूट पडल्यानतंर दोन गट पडले. एक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना. दुसरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना. या दोन्ही शिवसेनेनं आज स्वतंत्रपणे आपला 59 वा वर्धापन दिन साजरा केला.

ठाकरेंचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात झाला. तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा वरळी इथं पार पडला. यानंतर कोणाचा मेळावा जोरदार झाला? कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होती? याची चर्चा सुरू झाली. मात्र सोशल मीडियावर कुणाला पसंती मिळाली याची सुरूवातीची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात सुरू झाला. हा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याच्या आधी सुरू झाला. याचे थेट प्रक्षेपण शिवसेना UBT या युट्यूब चॅनेलवरून केले जात होते. या चॅनेलचे जवळपास 3 लाख 97 हजार ऐवढे सबस्क्रायबर आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहीले त्यावेळी 7 हजार 024 जण एकाच वेळी त्यांचे भाषण लाईव्ह ऐकत होते. मात्र जसं जसं भाषण पुढे गेलं तस तसा हा आकडा कमी होत गेला. काही वेळाने तो 6 हजार 665 वर गेला. त्यानंतर परत वाढून तो 6 हजार 842 वर स्थिरावला. उद्धव ठाकरेंच्या भाषणाला पहिल्या दोन तासात तब्बल दोन हजार पेक्षा जास्त लाईक आले होते. पहिल्या तीन तासात उद्धव ठाकरेंच्या भाषणाला साडे दहा हजार पेक्षा जास्त व्ह्यूज होते.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा मेळावाही लाईव्ह केला जात होता. तो शिवसेनेच्या युट्यूब चॅनेलवर केला जात होता. या चॅनेलचे 3 लाख 44 हजार सबस्क्रायबर आहेत. ज्या वेळी एकनाथ शिंदे भाषण करण्यासाठी उभे राहीले त्यावेळी 4 हजार 500 लोक त्यांचे भाषण युट्यूबवर पाहात होते. मात्र जसजसं त्यांचे भाषण पुढे गेले हा आकडा कमी झाला. तो 4 हजार 200 पर्यंत खाली आला. त्यांच्या भाषणाला पहिल्या तीन तासात 671 लाईक मिळाले होते. तर लाईव्ह सुरू केल्या पासून पहिल्या चार तासात 15 हजार 103 व्ह्यूज मिळाले होते.

युट्यूब वरिल आकड्यांची तुलाना केल्यास भाषण सुरू असताना एकाच वेळी सर्वात जास्त लोक हे उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकत होते. शिवाय त्यांना मिळालेले लाईक ही एकनाथ शिंदेंच्या भाषणा पेक्षा जास्त आहेत. दोन्ही शिवसेनेच्या युट्यूब चॅनेलच्या सबस्क्रायबरचा विचार केल्यास दोघांमध्ये तेवढा फरक नाही. जास्त व्ह्यूजमध्ये मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारली आहे. त्यामागे ही एक महत्वाचं कारण आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यक्रमाचं लाईव्ह हे ठाकरेंच्या लाईव्हच्या एक तास आधी सुरू झालं होतं. त्यामुळे शिंदेंचे लाईव्ह चार तास चालले तर ठाकरेंचे लाईव्ह हे तीन तास चालले. त्याचा फायदा शिंदेंना झालेला दिसतो. त्यांचे व्ह्यूज हे जास्त आले. पण अन्य आघाड्यांवर ठाकरेच पहिल्या तीन तासात वरचढ राहील्याचे युट्यूबच्या आकडेवारीवरून दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा