Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० जून, २०२५

*अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळेत दिंडी पालखी सोहळा संपन्न*

 


*अकलूज -प्रतिनिधी

कादरभाई  श़ेख

*टाइम्स 45 न्युज मराठी

प्रशालेत आज दिंडी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.याप्रसंगी  प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम उपस्थित होत्या. तसेच सर्व इयत्ता प्रमुख उपस्थित होते. प्रथमत: मान्यवरांच्या शुभहस्ते पालखी पूजन,प्रतिमापूजन,वारकरी सांप्रदायातील व अभिरूप पात्र साकारणाऱ्या  विठ्ठल-रुक्मिणी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत मुक्ताई, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा यांचे पूजन करण्यात आले.

     

        तदनंतर प्रशालेतील सहशिक्षक श्री दुधाट सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना वारीची परंपरा व महत्त्व सांगितले. त्यानंतर प्रशालेतील सहशिक्षिका कु.थोरात मॅडम यांनी गवळण,अभंगाचे सादरीकरण केले. तसेच प्रशालेतील विद्यार्थिनी कु.शताक्षीणी बोडके हिने आपल्या मधुर आवाजात अभंग सादर केला. तसेच प्रशालेतील संगीत शिक्षक श्री नवगिरे सर यांनी "तुझ्या नामाची आवडी"  हा अभंग सादर केला.याप्रसंगी सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षिका यांनी विठू नामाचा गजर करत प्रशालेचा परिसर दुमदुमला.यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेत उपस्थित होते.


      त्यानंतर समावि प्राथमिक शाळा-प्रतापसिंह चौक- समावि प्राथमिक शाळा अशी पालखीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी भालदार, चोपदार, पोलीस वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या दिंडी पालखी सोहळ्यात प्रशालेतील इयत्ता ३ री व ४ थी चे  विद्यार्थी व शिक्षक - शिक्षिका हरिनामाचा गजर करत सहभागी झाले होते.


         शेवटी प्रशालेच्या प्रांगणात अतिशय उत्साहाने गोल रिंगण सोहळा घेण्यात आला.त्यामध्ये प्रथम पताका,तुळस,टाळकरी, विणेकरी तसेच धाव,फुगड्या, अभंग,🎷भजन करून विद्यार्थ्यांनी रिंगणाचा आनंद घेतला आणि पालखीची आरती करून  सोहळ्याची सांगता झाली.

   



     सदर पालखी सोहळ्यास प्रशालेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर वृंद,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सूर्यवंशी सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा