उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
रूई,ता.बार्शी,जि.साेलापूर येथील जि.प.प्राथमिक शाळा व इंग्लिश स्पाेकन काेर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्यदिव्य पुरस्कार साेहळा आज पार पडला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.गाेरख पाटेकर,प्रमुख पाहुणे राजाभाऊ घाेडके सर,सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत पाटील सर,ग्रामशिक्षण कमिटीचे अध्यक्ष बालाजी चाबुकस्वार,मनाेज भाेसले सर,दत्तात्रय भाेसले,बंडू सुतार हे प्रमुख मान्यवर व गावकऱ्यांची उपस्थिती हाेती.शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप हाेते.त्याचबरोबर वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना कवी इंद्रजीत पाटील यांचा चाकरी हा कवितासंग्रहही भेट देण्यात आला.या प्रसंगी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे राजाभाऊ घाेडके सर,मुख्याध्यापक शस्त्रघ्नु घाेडके सर,साहित्यिक इंद्रजीत पाटील सर,किशाेर खडके यांनी आपली मते व्यक्त केली.प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्लिश स्पाेकन काेर्सचे सर्वेसर्वा महादेव सुरवसे सर यांनी केले.तर या कार्यक्रमासाठी महत्वपूर्ण याेगदान साै.वंदना सुरवसे मॅडम, साै.सुवर्णा डुरे मॅडम यांनी दिले.साहित्यिक इंद्रजीत पाटील यांच्या आभार प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम समाप्त करण्यात आला.सदर कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा