*सोलापूर --प्रतिनिधी*
*आबेद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापुरात पोलिसांनी मध्यरात्री एकाचा एन्काऊंटर केला. पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे घरात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी ठार केले. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असे २३ वर्षीय पुण्यातील सराईत गुंडाचे नाव आहे. आज लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेने त्याचा एन्काऊंटर केला. शाहरुखवर पुण्यात अनेक गुन्ह्याची नोंद होती.
शाहरुखवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यांमधून सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मकोकाच्या गुन्ह्यात शाहरुख फरार होता. शाहरूखला अटक करण्यासाठी पुणे पोलिस सोलापूरमध्ये दाखल झाले होते, पण शाहरूखने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी प्रतिहल्ला करत शाहरूखचा एन्काऊंटर केला.
दरम्यान या घटनेनंतर शाहरुखचे वडील आणि पत्नीसह नातेवाईकांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे. शाहरुख याचा एन्काऊंटर केल्यानंतर शाहरुखच्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. लांबोटी जवळील चंदननगर येथे चकमक करण्यासाठी गेलेल्या पथकाकडून गोळीबार करण्यात आल्याचा शाहरुख याच्या पत्नीचा आरोप आहे.
लांबोटी येथे शाहरुख याला पकडण्यासाठी आलेल्या पुणे शहर पथकाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार केल्याचा पत्नीचा आरोप आहे. पुणे शहर पोलिसातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शाहरुखकडून पैसे घेतल्याचा दावा वडील रहिम शेख यांनी केला असून या पथकातील पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी शाहरुखच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा