उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोझरी येथे उपोषण स्थळावर जाऊन. ओमप्रकाश उर्फ बच्चूजी कडू, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी आमदार यांची भेट घेतली आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर बच्चुभाऊ कडू यांनी उपोषण सोडले
याबाबत निवेदनात लेखी दिलेले आश्वासन पुढीलप्रमाणे
आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी खालील प्रमाणे आश्वासन देत आहे:-
१. शेतकरी कर्ज माफीसाठी १५ दिवसामधे उच्वस्तरीय समिती नेमली जाईल, सनितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्ज माफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
२. दिव्यांगाच्या मानधन वाढी बाबत ३० जून च्या पुरवणी बजेट मध्ये तरतूद करण्यात येईल.
३. उर्वरित मुद्यावर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांचे सोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील.
(चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे) मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावत जिल्हा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा