*सोलापूर --प्रतिनिधी*
*आबेद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
मोहोळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने मोहोळ येथील नागनाथ मंगल कार्यालय येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून मी स्वतः त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहे त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
पुढे म्हणाल्या सत्ताधारी हे निगरगट्ट आहेत दहा वर्षात खासदार नसल्यासारखी परिस्थिती होती. दहा वर्षाचा बॅकलॉग एका वर्षात कसा भरून निघणार भरपूर काम करायचे आहे. यासाठी मला तुमची साथ हवी आहे. मी स्वार्थासाठी राजकारण करत नाही. पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे लोकशाही पद्धतीने गाववाईज शाखा मजबूत झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. मोहोळ तालुक्यात बहुतांश गावात निधी दिला. राहिलेल्या गावांनाही पुढील काळात निधी दिला जाईल. वाईट काळात जो कार्यकर्ता पक्षासोबत एकनिष्ठ राहतो. त्यांच्याकडे नक्कीच लक्ष देण्यात येईल. पुढील काळात कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार केले जाईल.
यावेळी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा शाहीन शेख, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, सुरेश शिवपुजे, अरुण पाटील, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष मयूर खरात, बाळासाहेब डूबे पाटील, सिद्राम पवार, बाबासाहेब क्षीरसागर, किशोर पवार, आरिफ पठाण, रत्नाबाई कसबे, सुरेश हावळे, रतन अष्टूळ, संजय भोईर, राजेंद्र सर्जे, संतोष शिंदे, महादेव शिंदे, भीमराव वसेकर, वैभव कुचेकर, अविनाश कांबळे, निलेश जरग, हरीभाऊ कांबळे, रामदास पाटील, अमजद शेख, महादेव सुरवसे, महादेव शिंदे, टिपू मुजावर, विष्णू शिंदे, विजय पवार, बिरा खरात, सोमनाथ भोसले, केरप्पा गाढवे, शाहीर हावळे, यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा