Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ जून, २०२५

*वीज नाही... काळजी नको...! शेतकऱ्यांच्या घरीच थंड कोठार.* *विझोरी येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचा अभिनव प्रयोग,*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

विझोरी.(ता.माळशिरस) येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील अंतिम वर्षाच्या कृषीकन्यांनी वीज नाही..? काळजी नको घरीच थंड कोठारचा शेतकऱ्यांसमोर प्रयोग सादर केला. बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. उत्पन्नानंतर बाजारात योग्य भाव मिळत नाही .म्हणून शेतकऱ्यांना शेतीमाल मिळेल त्या भावात विकावा लागतो. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. शिवाय शेतकऱ्यांकडे साठवणुकीसाठी कोणतेही साधन उपलब्ध नसते.त्यामुळे घरगुती शीतकक्ष तयार केला आहे.यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्यांची साठवण करता येईल.अशी माहिती कृषीकन्यांनी दिली.

             रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील कृषीकन्यांनी विझोरी गावात ' झीरो एनर्जी कुलिंग चेंबर ' चे प्रात्यक्षिक सादर करत शेतकऱ्यांपुढे एक आश्वासक दिशा उभी केली.यासाठी विटा,नदीपात्रातील बारीक वाळू, बांबू, सुतळी,आदी. वस्तूंची आवश्यकता असते.पाण्याचा वापर करून थंड हवामान निर्माण केलं जातं.बाहेरील तापमानापेक्षा ८- ९ अंशांनी कमी तापमान राखले जाते.त्यामुळे भाजीपाला, फळे, फुले,दीर्घकाळ सुरक्षित साठवण शक्य होते. विजेवर अवलंबून न राहता उत्पादन टिकविण्याचे सामर्थ्य या पद्धतीत असल्याचे कृषिकांनी सांगितले.

       या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी वैभवी ढेंबरे, वैष्णवी शिंदे, प्रणोती कोरे,शिवानी पावले,ऋतुपर्णा सावंत,प्रीती फडतरे,अमृता बांदल, तेजश्री शिंदे,यांनी शेतकऱ्यांना केले.या प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहितेपाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी.नलावडे, प्रा. एस. एम एकपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा.एस.एम.चंदनकर(कार्यक्रम अधिकारी),

प्रा.एच.एस.खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा