*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये दि.५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या दिवशी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूकतेसाठी महत्वपुर्ण असल्याने त्याचे औचित्य साधुन कारखान्याचे वतीने कारखाना परिसर व विभागीय कार्यालय,कामगार कॉलनी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि,शंकरनगर- अकलूज या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते-पाटील यांनी कारखाना स्थापनेपासून कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात पृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन केलेले आहे.तसेच कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील तसेच कारखानाचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना कार्यक्षेत्रात वेळोवेळी वृक्षलागवडीचा स्तुत्य कार्यक्रम हाती घेण्यात येवून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंर्वधन करण्यात आले असल्याने कारखाना परिसरात निसर्गरम्य वातारण तयार झाले असून परिसरामध्ये प्रसन्नता दिसून येत आहे.
यावर्षीचे जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेतून प्लास्टीक प्रदुषणाचा अंत करणे करीता दैनंदिन जिवनामध्ये प्लॅस्टीकचा वापर कसा टाळता येईल याची दक्षता घेण्यासाठी व जनजागृती करणेसाठी परिसरामध्ये बैनर्स लावणेत आले आहेत.केंद्र शासनाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिशन लाईफचे स्वप्न पुढे नेण्यासाठी "एक पेड भी के नाम' या उपक्रमामध्ये १० कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे, त्याचाच एक भाग म्हणून सहकार महर्षि कारखान्याने कारखाना परिसर,विभागीय कार्यालय व कामगार कॉलनी येथे विविध जातीची २००० झाडांची लागवड करणेचे नियोजन केले असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी दिली.
या कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे चिफ अर्कोटंट वाय.बी. इनामदार,चिफ इंजिनिअर-एस. के.गोडसे,चिफ केमिस्ट एस.एन. जाधव,डिस्टीलरी मॅनेजर डी. व्ही.रणवरे,को-जन मॅनेजर-वाय. के.निंबाळकर,सिव्हील इंजिनिअर एस.ए.शेखर, ॲसेटीक ॲसिड इन्चार्ज एस.एम.देशमुख,इन्चार्ज शेतकी अधिकारी आर.एस.चव्हाण, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर एस.जे. नरसाळे,पर्यावरण अधिकारी- पी.एच.इनामदार,लेबर ऑफिसर एस.एम.साळुंखे,परचेस ऑफिसर आर.एस.गायकवाड, हेड टाईम किपर व्ही.आर.वाघ, सुरक्षा अधिकारी एन.सी. निंबाळकर ऊस विकास अधिकारी एम.एम.भेगडे, कार्यलक्षी संचालक आर.डी. रणनवरे,कामगार व युनियन प्रतिनिधी तसेच शेती विभागाचे ॲग्री ओव्हरसियर,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा