उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
आज दिनांक २१ जून २०२५ रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहाद्दूर गट(बिजवडी) येथे योग दिन विविध योगासने, प्राणायाम करून साजरा केला गेला.
योग हा निरोगी जीवनासाठी उपयुक्त आहे. दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीराला व्यायाम मिळतो, हृदय, फुफ्फुसे,आतडी कार्यक्षम बनतात, रक्ताभिसरण सुधारते, त्वचा टवटवीत होते. नियमितपणे व्यायाम, योगासने, प्राणायाम करून आपले मानसिक व शारीरिक आरोग्य सदृढ राहू शकते असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीकांत राऊत सरांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना व्यायामाचे, योगासनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर विविध शारीरिक हालचाली, व्यायाम प्रकार घेण्यात आले.विविध प्रकारची योगासने त्यामध्ये पद्मासन, वज्रासन, भुजंगासन, धनुरासन, हलासन, चक्रासन, पर्वतासन, सूर्यनमस्कार घेण्यात आले. प्रत्येक योगासनाचे फायदे योगासने सुरू असताना श्री. अजमीर फकीर सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शेवटी प्राणायाम घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सकाळच्या अल्हाददायक वातावरणामध्ये सर्व मुले आनंदाने योगासने,प्राणायाम करत होती. शेवटी 'एक पेड माँ के नाम'याबाबत सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करण्यासाठी शाळेच्या वतीने आवाहन करण्यात आले. वीस मिनिटानंतर विद्यार्थ्यांना फलाहार म्हणून केळी वाटप करण्यात आले. आजच्या योग दिनाच्या कार्यक्रमात मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी पालक यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा