*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज - येथील वृत्तपत्र विक्रेते महेश कुलकर्णी यांच्या मुलाने वकिलीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवले. त्यामुळे आयष्य भराच्या मेहनतीला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
वयाच्या 17 व्या वर्षापासून महेश कुलकर्णी हे अकलूज शहरातील चौकामध्ये बसून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. वृत्तपत्र विक्रीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून जिद्दीने त्यांनी आपल्या मुलीचे लग्न केले. बीसीएस चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलाने वकील होण्याची इच्छा व्यक्त केली. परिस्थिती प्रतिकूल असतानाही महेश व त्यांच्या कुटुंबीयांनी अपार कष्ट करून मुलाला वकील केले. त्यांच्या कष्टाला व जिद्दीला सगळीकडून कौतुकाची थाप मिळत आहे.
श्रेयश महेश कुलकर्णी हे वकील झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा