*यशवंतनगर-- प्रतिनिधी*
*नाझिया. मुल्ला*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विक्रम साळुंखे प्र. पोलीस निरीक्षक अकलूज, अॅड.नितीनराव खराडे सभापती स्थानिक प्रशाला समिती, अनिल जाधव प्रशाला समिती सदस्य उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांचे प्रवेशद्वारावर औक्षण करण्यात आले.
भारताची प्राचीन परंपरा योग आणि सांस्कृतिकतेचा वारसा असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
प्रमुख अतिथींच्या हस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सन्मान समारंभ मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर संपन्न झाला.
प्रमुख अतिथी विक्रम साळुंखे पोलीस निरीक्षक अकलूज यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना ताण-तणावाच्या जीवनशैलीत योगच सर्वोत्तम आधार असल्याचे सांगितले.
आर्ट ऑफ लिव्हिंग व आयुष मंत्रालय भारत सरकार मान्यता प्राप्त योगशिक्षक प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी प्राचीन ,शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आभ्यासाची सांगड घालणाऱ्या योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी महर्षि संकुलातील महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला ,महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक शाळा यशवंतनगर येथील सर्व प्रमुख मान्यवर ,विद्यार्थी ,शिक्षक वृंद व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पूरक हालचाली ,प्राणायाम, ताडासन, वृक्षासन ,अर्धाचक्रासन, कपालभाती ,ध्यान यांसारखे विविध योग प्रकार घेण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी पांडुरंग जाधव पोलीस अकलूज , मुख्याध्यापिका अनिता पवार, उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी, पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर दुपडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा