*सोलापूर --प्रतिनिधी*
*आबेद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला माजी मंत्री बंटी सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार विशाल पाटील, इंडी चे आमदार यशवंत गौडा पाटील, यांच्यासह अक्कलकोट तालुक्यातील मान्यवर नेतेमंडळी सहभागी झाले होते. अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून महादेवराव पाटील आणि सहकाऱ्यांच्या नेटक्या नियोजनातून झालेल्या या मेळाव्याला हजारो नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
गरिबांचे आश्रु पुसण्याचे काम काँग्रेस करत आली आहे. त्यामुळे स्वाभिमानी असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील मतदार पुन्हा काँग्रेसला संधी देतील असा विश्वास यावेळी मान्यवरांनी बोलताना व्यक्त केला.
पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्त्यांमध्येच असते. कार्यकर्ते हेच गावपातळीपासून दिल्लीपर्यंत पक्षाचे खरे प्रतिनिधी असतात. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिले शिवाय सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांने या संघर्षाचे पाईक झाले पाहिजे.
पारदर्शक प्रशासन, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकास हे काँग्रेसचे ध्येय पुन्हा एकदा प्रभावीपणे राबवण्यासाठी संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी अक्कलकोटच्या मा. नगराध्यक्षा सुवर्णाताई मलगोंडा, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अशफाक बळोरगी, माजी सभापती संजय गायकवाड, अरूण जाधव, सुनिताताई दुपारगुडे, सातलिंग शटगार, शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुकानुरे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांच्यासह अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा