*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहोकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
करमाळा तालुक्यात जेऊर येथे बँक ऑफ इंडिया शाखेचे नुकतेच उदघाटन झोनल मँनेजर चंद्रशेखर मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून करमाळाच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे,जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, आदिनाथ चे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील उपस्थित होते. करमाळा तालुक्यात बँकेची सातवी शाखा व जेऊर येथील पहिल्या शाखेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री.मंत्री म्हणाले की,ग्रामीण भागाच्या विकासमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे फार मोठे योगदान आहे म्हणून सर्व ग्रामस्थांनी बँकेच्या सर्व सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी करमाळाच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,गावाचा प्रगती होण्यासाठी बँकेची भूमिका महत्वाची असते. शासकीय योजनांचा बँकेच्या मदतीने शेतकरी व्यवसायीक सुशिक्षित तरूणांनीआपली प्रगती करून घ्यावी.तर जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील शेतकरी याला प्रामुख्याने महत्व देऊन त्यांची सेवा करावी असे म्हणाले.यावेळी आदिनाथ चे व्हा.चेअरमन महेंद्र पाटील यांनी आपले मत व्यक्त केले,
या कार्यक्रमासाठी चीफ मॅनेजर अमरजीतकुमार सिंह,एस.सी.ए.ऑफिसर असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सांगळे,एस, टी.असोसिएशनचे अध्यक्ष एस.आर.पुजारी आदि उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी जेऊर गावातील सर्व व्यापारी, शेतकरी,व्यापारी उपस्थित होते.शहरातील प्रमुख व्यापारी प्रतिनिधी सुरेश लोंढे,प्रदीप घोलप,गणेश पंडित,प्रशांत पाथरूडकर,प्रमोद शिंदे,महादेव बोराडे,पांडुरंग भोई आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन आढाव यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार शाखेचे शाखाधिकारी नितीन फासे यांनी मानले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल हजारे,नितीन काळे,रमेश,रियाज,रवी यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा