*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माढ्याचे लोकप्रिय खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रमामाता तरुण मंडळ अकलूजचे सदस्य व विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज, अकलूजचे चेअरमन पराग गायकवाड यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळामध्ये वह्या वाटप माजी सरपंच ,युवक नेतृत्व शिवतेंजसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी एक हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवतेंजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की, अकलूज मधील गोर गरीब विद्यार्थ्यांना नेहमी मदत करण्याची भूमिका मोहिते पाटील कुटुंबाची आहे. सध्या जिल्हा परिषद शाळेतील विविध समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चांगले अध्यापनाचे काम करत आहेत, अकलूज मधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळतं आहे त्यामुळे ते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळतं आहे.कार्यकर्त्यांनी असे सामाजिक उपक्रम केले पाहिजेत असे आवाहन शिवतेंजसिंह मोहिते पाटील यांनी केले. यावेळी शिवतेंजसिंह मोहिते पाटील यांनी पराग गायकवाड व मित्र परिवाराचे कौतुक केले व यापुढे असेच सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत असे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक चेअरमन पराग गायकवाड,, माजी ग्रामपंचायत सरपंच विठ्ठल नाना गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल(बंटी) जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाचे प्रा. नरेंद्र भोसले,माजी ग्रामपंचायत सदस्य,, शंकर गायकवाड,माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल मोरे, श्रीकांत राऊत सर, ग्रामपंचायत सदस्य फुले मेंबर व अनिल गायकवाड, सागर किशोर गायकवाड ,स्वागत गायकवाड,आदेश गायकवाड, लखन गायकवाड ,संदेश गायकवाड, सचिन गायकवाड, सोजल गायकवाड, ऋषी गायकवाड ,गणेश गायकवाड ,शैलेश साबळे,आदर्श गायकवाड,विश्वास भोसले ,संजय ताकतोडे, महेश शिंदे, शैलेश दिवटे,सागर काटे,ओंकार सावंत, निलेश शिंदे, यश लोंढे, अमोल भोसले, अजय कांबळे, जय खरे ,विक्रम धाईंजे,जॉन सर, राहुल सर, विखे खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रप्रमुख प्रभाकर ननवरे व अकलूज मधील सर्व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा