*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, गरजा आणि विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
ग्रामस्थांनी या वेळी वडकबाळ येथील सीना नदीवर ४.५ मीटरचे बॅरेज बांधणे, महादेव मंदिराजवळ व यल्लाम्मा देवी मंदिराशेजारी सभामंडप उभारणे, येळेगाव ते वांगी रस्त्याचे काम, हिंदू व मुस्लिम कब्रस्तानांभोवती संरक्षक भिंत, वडकबाळ रस्त्यापासून पीर दर्ग्यापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व जिल्हा परिषद शाळेसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे या महत्त्वाच्या कामांची मागणी केली.
या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी वांगी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व स्तरावर पाठपुरावा करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव, प्रा. सुभाष बिराजदार, श्रीकांत ठेंगील, विठ्ठल सुतार, चन्नप्पा बनशेट्टी, जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज यलगुलवार, नागनाथ जवळकोटे, रामचंद्र ढगे, धर्मराज खडाखडे, अल्लाउद्दीन मकादार, यलप्पा बनसोडे, धारेप्पा खडाखडे, बसवराज जवळकोटे, सद्दाम शेख, सचिन काळे, ललिता बिराजदार, सौ. पुजारी, सूर्यकांत पाटील, शिवानंद साखरे, सोमनाथ बचुटे, गंगाधर जवळकोटे, सादिक आत्तार, धनव्वा सुतार, उत्तम सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा