*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील सात रस्ता, फॉरेस्ट, जांबवीर सोसायटी, भारत माता प्राथमिक शाळा, आसरा चौक टंगसाल नगर, विजापूर वेस, स्टेशन रिक्षा स्टॉप, जांबमुनी मित्र मंडळ अश्या विविध ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. ऐंशी वर्षांपूर्वी काँग्रेसने स्वातंत्र्याची लढाई लढली. आज पुन्हा एकदा "पहले लढे ते गोरों से, अब लढेंगे चोरों से" ही हाक देत, लोकशाही वाचविण्याची गरज आहे. लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने जातीपातीचा विचार न करता, एकमेकांना साथ देणे आवश्यक आहे. मतदान हे देशाचे प्राण आहे; पण आज त्याची चोरी होत आहे, ज्यामुळे लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. देशात आणि महाराष्ट्रात आलेले सध्याचे सरकार हे चोरीचे सरकार आहे. या विरोधात काँग्रेस नेहमीच लढली आहे आणि आजही लढणार आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नव्हते, तेच आज सत्तेत आहेत. अशा मतदान चोरांचा फर्दाफाश करून लोकशाही वाचविण्यासाठी आणि गोरगरीब, दिन, दलीत अल्पसंख्यांक आणि आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी लढा देणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. या लढाईसाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. चला, एकत्र येऊन लोकशाही वाचवूया आणि आपल्या अधिकारासाठी ठामपणे उभे राहूया.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा