*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहोकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील तोंडले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.प्रियंका ज्योतिराम चव्हाण यांचा बिनविरोध निवड झाली.त्याबद्दल माळशिरस तालुका जिजाऊ बिग्रेडच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
तोंडले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा शरद चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते.या उपसरपंच पदाच्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भिकाजी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.यावेळी उपसरपंच पदासाठी सौ.प्रियंका ज्योतीराम चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले.
माळशिरस तालुका जिजाऊ बिग्रेडच्या तालुकाध्यक्ष सौ.शारदा चव्हाण यांच्या हस्ते सौ.प्रियांका चव्हाण यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी राजमाता माँसाहेब जिजाऊ चरित्र पुस्तक भेट देण्यात आले.यावेळी ज्योतीराम चव्हाण, सौ.सुनिता काटकर व निलेश चव्हाण व निलेश कांबळे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा