Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

*प्रशिक्षणार्थीना "संजीवन संस्थे "च्या वतीने 'प्रमाणपत्र' वितरण कार्यक्रम संपन्न...*

 


*लातुर ---प्रतिनिधी*

  *अमोल. गायकवाड*

*टाइम्स 45 न्यूज मराठी


लातूर शहरात एंजल वन, उन्नती आणि राह फाउंडेशन यांच्या सहकार्याने आणि संजीवन एकात्मिक विकास व संशोधन संस्था यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या समर्थ प्रकल्पा अंतर्गत संगणक प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, स्पोकन इंग्लिश, जीवन कौशल्य, संवाद कौशल्य, समस्या सोडविणे, स्वयं व्यवस्थापन आणि आर्थिक साक्षरता अशा विविध कोर्सेस पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राह फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहन राठोड, प्रा. पंचशील डावकर आणि लोकपरवर्तन संस्थेचे अध्यक्ष बलभीम सुरवसे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

      प्रा. पंचशील डावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “या प्रकल्पामुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुला-मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा आणण्यास मदत झाली आहे. कौशल्य विकास हेच भविष्याचे भांडवल असून संगणकासह इतर आवश्यक कौशल्ये आत्मसात करणं अत्यावश्यक आहे.”

मोहन राठोड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आज ज्ञानासोबतच कौशल्य असणाऱ्याला महत्त्व आहे. आपण ठरवलेलं ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या कौशल्यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनून नोकरीच्या संधी मिळवाव्यात.”

      बलभीम सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना केवळ प्रमाणपत्रापुरता मर्यादित न राहता आत्मनिर्भर होण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला.

      कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींनी कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांची मोकळेपणाने मांडणी केली.

        कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमोल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नवनाथ गवळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार केंद्र व्यवस्थापक ऋषिकेश भोसले यांनी मानले.

      या प्रसंगी संजीवन संस्थेचे चेंजमेकर रोहित मालकर, आशा तिवारी, प्रियांका गोरे तसेच अनेक प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा