Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

*पत्रकार -रुपेश डोलारे "आदर्श समाजसेवा' पुरस्काराने सन्मानित*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

तुळजापूर तालुक्यातील धडाडीचे पत्रकार रुपेश डोलारे यांना संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव व संभव प्रतिष्ठान केशेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न साहित्य सूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार सन्मान सोहळा २०२५ हा पुरस्कार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

  रुपेश डोलारे यांना हा पुरस्कार प्रदान करून त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणारे सन्मान पत्र

आजपर्यंत आपण केलेल्या/करीत असलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल/यशाबद्दल आपणास हे सन्मानपत्र देतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.


आपण मराठमोळ्या महाराष्ट्राच्या मातीतील एक अनमोल रत्न आहात. घामाने भिजणाऱ्या आणि कष्टाने थकणाऱ्या ग्रामिण भागातील उपेक्षित, वंचित, पिडीत, शोषीत् व सर्वसामान्य जनतेच्या सुख दुखःच्या प्रसंगी त्यांच्या वर्तन बदलासाठी व नव संजीवनी देण्याचे महत्वपूर्ण कार्य आपण करीत आहात. बहुजन समाजाला अधिक समूध्द करण्यासाठी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.


जन माणसासाठी समर्पित जीवनाचा दिव्य वारसा आपण चालवीत आहात. आपल्या परिश्रमी जीवनाची वाटचाल आम्हास प्रेरणादायी वाटते. "बुडते हे जन, न् देखवे डोळा" या ध्यासाने आपण आपल्या कार्यात निस्वार्थीपणे स्वतःला झोकुन व वाहून घेतले आहे. तुम्ही करीत असलेल्या कार्याला पाठबळ द्यावं, पाठीवर कौतुकाची थाप टाकावी म्हणून "संत् तुकाराम सामाजिक संस्था, बाभळगांव व संभव प्रतिष्ठान, केशेगांव यांच्या वतीने आपल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आपला सन्मान करीत आहोत. पुढील पिढीसाठी आपल्या कर्तृत्वाचा दिपस्तंभ सर्वांना मार्गदर्शख ठरावा, समाजातील वंचित पिढीला व शेवटच्या घटकापर्यंत आपली सेवा पोहोचवावी अशी माफक अपेक्षा! आपल्या सेवेच्या सन्मानार्थ कृतज्ञतापूर्वक आपणास हे सन्मानपत्र अर्पित करीत आहोत."



श्री. दयानंद काळुंके

संस्थापक, संत तुकाराम सा. संस्था, बाभळगांव

श्री. तुकाराम क्षीरसागर संस्थापक, संभव प्रतिष्ठान, केशेगांव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा