Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

*आता सर्वसामान्य वाहनधारकांना एसटी आगारात भरता येणार डिझेल पेट्रोल--- किरकोळ इंधन विक्री होणार ----परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

मुंबई : उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागिदारीतून एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीसाठी किरकोळ विक्री पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामुळे खासगी वाहनधारकांना एसटी आगारात जाऊन पेट्रोल, डिझेल भरता येणार आहे.

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली असून अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून राहणे कठीण झाले आहे. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे.

एसटीच्या किती आगारात इंधन उपलब्ध होईल ?

गेल्या ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल विकत घेत आहे. सध्या २५१ ठिकाणी एसटीच्या स्वतः च्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून याद्वारे केवळ एसटीच्या बससाठी डिझेलचे वितरण होते. त्यामुळे पेट्रोल पंप चालवणे आणि त्याचे देखभाल करण्याचा अनुभव एसटी महामंडळाला आहे. त्यामुळे भविष्यात केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम असलेल्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांशी व्यावसायिक करार करून सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल, डिझेल व तत्सम इंधन विक्री करणारे पंप उभा करणे प्रस्तावित आहे.

पेट्रोल पंपासह दुकानेही उभारणार

पेट्रोल पंप रस्त्यालगत व व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या स्वतःच्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अशा २५ बाय ३० मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी पेट्रोल पंपच नव्हे, तर किरकोळ दुकानेही उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायाला संधी उपलब्ध होईल. यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक भागिदारीद्वारे चांगला महसूल देखील मिळू शकतो.

परिवहन मंत्री काय म्हणाले ?


इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या केंद सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी राज्य शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या एसटी महामंडळाशी व्यावसायिक भागिदारीचा करार करण्यात येईल. हा करार एका अर्थाने केंद्र आणि राज्य शासनाच्या दरम्यान होत असल्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वितरणामध्ये पारदर्शकता राहील. यासाठी संबंधित कंपन्यांनी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सर्व जागांचे व्यावसायिक सर्वेक्षण करून २५१ ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाचे एसटी महामंडळाच्या स्वतःच्या नव्या व्यवसायिक दृष्ट्या मोक्याच्या २५ बाय ३० मीटर जागेवर स्थलांतर केले जाईल. जिथे एसटी महामंडळाला स्वतःच्या बससाठी इंधन भरण्याची सोय असेल. याचबरोबर महामंडळाला सर्वसामान्य ग्राहकांना किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल. अशा पद्धतीचे ‘पेट्रो-मोटेल हब’ उभा करण्याचा मानस आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा