*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहोकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील शिवभक्त विठ्ठल रामचंद्र बागल यांच्या घरी आज श्रावणी तिसऱ्या सोमवार निमित्त वेळापूर मठाधिपत शिवाचार्यश्री गुरु मुक्तेश्वर महाराज यांची ईस्टलिंग महापूजा (बिनीवा) मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला सुमारे तीन तास हे पूजन चालू होते.यजमान ज्ञानेश्वर विठ्ठल बागल व सौ.रतन ज्ञानेश्वर बागल यांनी महाराजांची पाद्यपूजा करून पूजन केले पूजेसाठी मुळे गुरुजी,आप्पा वाळके व वेळापूर मठातील बटू यांनी सहकार्य केले.याप्रसंगी बागल कुटुंबातील प्रमुख विठ्ठल बागल,सौ कुसुम बागल,भारत बागल,संगीता बागल,शिवाजी बागल,पार्वती बागल यांचे बरोबर चंद्रकांत कुंभार व सौ शामा चंद्रकांत कुंभार उपस्थितीत होते.या पूजेचा लाभ परिसरातील अनेक शिवभक्तांनी घेतला पूजेनंतर महाप्रसाद झाला.यावेळी श्री गरु मुक्तेश्वर महाराज यांच्या गुरू गादीस पन्नास वर्षे पूर्ण होत असून त्यांचा ७५ वा वाढदिवस आहे मार्च महिन्यामध्ये आहे याचे औचत्य साधून जगद्गुरु रंभापुरी महाराज व जगद्गुरु उज्जैनचे महाराज यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे विठ्ठल बागल यांनी सांगितले त्याच बरोबर या कार्यक्रमाचे नियोजन बाबत चर्चा करण्यात आली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा