Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

*महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या मागणीला यश* *अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजीपाल्याचे लिलाव वजनाप्रमाणे करण्यास प्रारंभ*

 


संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

अकलूज बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव हे वजनावर न होता कॅरेट प्रमाणे केले जात होते 

याबाबत महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व सर्व शेतकऱ्यांचे वतीने, विविध मागण्यांचे निवेदन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते.यामध्ये

बाजार समितीतील भाजीपाला लिलाव वजनाप्रमाणे झाला पाहिजे. भाजीपाला वजन करून विकल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि खरेदीदारांचीही फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. 

तसेच बाजार समितीत भाजीपाला लिलाव करताना वजनकाटा प्रमाणित असणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. 

 तसेच शेतकऱ्यांचे पट्टीमध्ये कमिशन कपात करु नये अशी मागणी करण्यात आली होती.


त्याअनुषंगाने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने दिनांक 8/8/2025 पासुन भाजीपाला लिलाव वजनाप्रमाणे करण्यास सुरुवात केली आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळणार आहे.यासाठी शेतकऱ्यांनी जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील यांचे आभार मानले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा