Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ एप्रिल, २०२४

*देशाला फक्त आंबेडकर वादच वाचूवू शकतो -----सुरज वनसाळे.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


दोस्ती मित्र मंडळ,आठदारे - लासुर्णे,तालुका इंदापूर यांच्या वतीने रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता साजरा करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती महोत्सवात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना " मी आंबेडकरवादी " सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांनी सांगितले की, या देशामध्ये भारतीय संविधान व भारतीय लोकशाही धोक्यात असुन जर या देशाला अशा परिस्थितीतुन कोण वाचवणार असेल तर तो आंबेडकरवादच आहे तसेच प्रत्येक घरात, प्रत्येक मातेच्या कुशीतून एक आंबेडकरवादी जन्माला यावा असे उद्गार काढले. 

                यावेळी सर्व महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करून सुरज वनसाळे व महेश लोंढे यांच्या हस्ते नील ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरज वनसाळे होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अमर हजारे सर, प्रमुख पाहुणे महेश लोंढे, गजानन वाकसे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे, सुर्यगंध सर, उत्तम सावंत, आण्णा भोसले, पोपट आठवले, महेश रूपनवर, उबाळे सर, वामन वाघमारे, सोमनाथ कांबळे, समाधान जावीर, आनंद फरतडे हे उपस्थित होते.




              सुत्रसंचलन मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे सचिव अनिल केंगार यांनी केले तर आबा चंदनशिवे, गोपाळ जावीर, दयानंद खरात, आकाश वाघमारे, सौरभ करडे, अतूल काटे, प्रमोद जावीर व जयंती उत्सव समितीने चांगल्या पद्धतीने नियोजन केले होते. स्थानिक नागरीकांनी कार्यक्रमाला चांगला उत्साहात प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा