Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ जानेवारी, २०२५

*केळी पिक दशा आणि दिशा*-- *सेवा रत्न सतीश कचरे मंडल कृषी अधिकारी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

महाराष्ट्राच्या व बळीराजाच्या अर्थकारणात ,समाजकारणात महत्त्वाचा वाटा असलेले केळी हे एक पीक आहे .शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ होण्यास केळी पिकाचा मोलाचा वाटा आहे . या पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढ होत आहे. प्रामुख्याने ऊस पिकाखालील क्षेत्र या पिकाखाली वर्ग होत आहे .शाश्वत पाणी व्यवस्था, हमखास ,उत्पादन, वाढलेले भाव, फ्री कुलिंग सेंटर, कोल्ड स्टोरेज ,निर्यातदार यामुळे पिकाला चांगला भाव मिळत असल्याने केळी पिकाकडे शेतकरी बांधवांचा कल वाढला आहे . सद्य परिस्थितीत सर्व टिशू कल्चर उत्पादक कंपनी व रोपवाटिका याकडे रोपे मागणी एक ते तीन महिने प्रलंबित आहे .सद्यस्थितीत हवामान घटक तापमानातील घट व उच्च तापमान, वादळ, वारे, वाढलेलेआद्रता, यामुळे केळी पिकावरील किडी व विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगाची वाढ होत आहे .सारांश -उच्च प्रतीची रोगमुक्त कंद व रोपे, सदैव वाफसा कंडिशन, रासायनिक खताचा माती परीक्षण वर आधारित एकात्मिक व संतुलित वापर, बागेची सर्वसाधारण स्वच्छता ,शिफारशीनुसार जमीन प्रकार नुसार लागवड अंतर, यजमान पिकाची आंतरपीक म्हणून वापर प्रतिबंध, तपमनाच्या कमी वेळी शाश्वत रात्रीचे पाणी देणे, पाचटाचा धूर करणे ,पिकाची फेरपालट, रोगग्रस्त केळ व खोड समुळ नष्ट करणे ,चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर,बागेभोवती दोन मीटर अंतर सोडून शेवरी बांबू सुरू वारा प्रतिबंधकाचा वापर, पीएसबी ,या ॲज्युसोस्पेरियम, ट्रायकोडर्मा मायकोरायझा, इत्यादींचा वापर ,. एकात्मिक किड व रोग नियंत्रण, केळी घडावर सहा टक्के सच्छिद्र असलेले 0 .5 एम एम 75 x१००आकारमानाच्या अँटी स्कर्टिंगचा वापर इत्यादी बाबींचा काटेकोर, प्रतिबंधात्मक, आयोजन, नियोजन व पालन व उपाय केला तर नक्कीच निर्यात क्षम उत्पादन घेता येईल व सद्यपरिस्थितीत केळीवरील कीड व रोग यामुळे झालेली दशा आपल्याला वरील बागेचा वापर करून चांगली दिशा मिळता येईल यात काही शंका नाही .केळीवरील खालील महत्त्वाच्या किडी व रोगामुळे केळीची जी दशा झाली आहे त्यावर खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय करून चांगली दिशा मिळवता येईल केळीवरील प्रमुख रोग व त्याचे प्रतिबंधात्मक उपचार खालील प्रमाणे . १ - *केळी करपा रोग* -वातावरणातील घटक उदाहरणार्थ तापमान यातील चढउतार आद्रतेतील वाढ यामुळे केळी पानावर करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे .मध्ये पानावर पिवळे रंगाचे ठिपके ते कालांतराने मोठे तदनंतर आतील भाग करडा पाणी पिवळसर पडून पानाला चिरा जाऊन जळून जातात यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर बाधा होऊन पिकाची वाढ होत नाही व उत्पादनात लक्षणे घट होते . *प्रतिबंधात्मक उपाय* : १ -कंदवरोपे रोगमुक्त रोपवाटिकेतून घ्यावीत २ -पिकाची फेरपालट करावी ३ -जर कंदाने लागवड करत असाल तर कंद शंभर लिटर पाण्यात दीडशे ग्रॅम ॲसिफेट +100 ग्रॅम 0.5टक्के कार्बेन्डेझि अम अर्धा तास बुडवून लागवड करावी व रोपावर या द्रावणाचा स्प्रे घ्यावा ४-केळी बॅग तनमुक्त हवाखेळती राहील राहील कायम वापसा कंडिशन मध्ये ठेवावी ५ -पिकाची फेरपालट करावी ६ -माती परीक्षणावर आधारित एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन करावे .

२ - *कुकुंम्बर मोझॅक* (सी एम व्ही ) -हा याकेळीतील विषाणूजन्य रोग आहे याचा प्रसार रोगग्रस्त रोपे व कंदातून होतो व या प्रसारासाठी मावा किडीचा सहभाग आहे . रोगाच्या लक्षणांमध्ये कोवळ्या पाण्यातील शिरामधील हरितद्रव्य लोप पावून पानावर पिवळसरपट्टे दिसतात व पानाच्या शिरा चा भाग काळपट पडून रोपाची मर होते यामध्ये पाणी फाटणे आकसने शिरा जाड होणे पाणी जाड होणे पानांचा गुच्छ पोंगा पिवळा पडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात .

 *प्रतिबंधात्मक उपाय* :- १ -विद्यापीठाच्या शिफारनुसार हंगामी खालील प्रमाणे केळीची लागवड जून ऑक्टोंबर व फेब्रुवारी मध्येच करावी २ -मावा कडीचा बंदोबस्तासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा डायमी थोएट पाच टक्के ची फवारणी आलटून पालटून करावी .३ -केळी पिकाच्या जवळ अथवा आंतरपीक म्हणून काकडी भोपळा कारले इत्यादीची लागवड करू नये ४ -रोगग्रस्त रोपे उपटून समोर नष्ट करावेत ५ - एकरी ५ चिकट सापळे वापरावेत ६ -उच्च प्रतीच्या उती संवर्धन रोपांची निवड व लागवड करावी ७ -ट्रक क्रॉप म्हणून शेताभोवती मक्याची लागवड करावी .

 *पनामा (मर रोग )* : -हा बुरशीजन्य रोग आहे या बुरशीमुळे होतो ही बुरशी जमिनीत दीर्घकाळ राहते व या वर्षीचा प्रसार माती अवजारे सिंचन कामगार मजूर ट्रॅक्टर इत्यादीमुळे होतो .यामध्ये प्रामुख्याने मुळे कुजून रोपाची मर होते .



 *प्रतिबंधात्मक उपाय :-* १ -या रोगाच्या नियंत्रणासाठी स्युडोमोनास फ्लोरेसन्स व ॲरक्युस्क्युलर मायक्रोरायझा व ट्रायकोडर्मा एकरी दहा किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी वापर करावा २ -लागवडीनंतर दोन व चार महिन्यांनी टेक्यूकोनॉ झोल प्रति लिटर एक मिली द्रावण चे आळवणी करावे ३ -वाहने अवजारे पादत्राणे ट्रॅक्टर मजुरांची कपडे इत्यादीचे निर्जंतुकीकरण करावे ४ -पाणी जमिनीला न देता झाडांच्या मुळांना द्यावे व सदैव वापसा कंडीशन ठेवावे . ५ - रोगग्रस्त झाडे उपटून समोर नष्ट करावीत .अशाप्रकारे केळीवरील महत्त्वाच्या रोगाचे नियंत्रण केल्याने नक्कीच फायद्याचे होईल संकलन -श्री सेवारत्न सतीश कचरे मंडल कृषी अधिकारी अकलूज आयएसओ 9001 : 2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा