*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिर्डीतील अजित पवार गटाच्या अधिवेशनात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार गटाच्या शिर्डीतील अधिवेशना दरम्यान ते राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार असल्याचे वृत्त आहे. सतीश चव्हाण हे विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. त्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर सतीश चव्हाण यांनी डाव बदलला आहे. सतीश चव्हाण हे अजित पवार गटाच्या आज ( शनिवार) शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी याबाबत सांगितले की, सतीश चव्हाण यांनी १० ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, यामुळे त्यांना सहा वर्षासाठी निलंबित केले होते. आता त्यांनी १३ जानेवारी रोजी शरद पवार गटाचा राजीनामा दिला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास व्यक्त करुन पुन्हा पक्षाचे काम प्रमाणिकपणे करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे आता त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा